Pik Vima : शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र या अडचणीवरून मात देऊन शेतकरी आपलं पीक फुलवत असतात. मात्र नैसर्गिक आपत्ती, आसमानी संकट, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्याचा हातात तोंडाशी आलेला घास कधीकधी नष्ट होतो. याचा विचार करून सरकार शेतकऱ्यांना मदत देखील करत असते. शेतकऱ्यांसाठी देशात कायमच नवीन योजना राबवल्या जातात. आता सध्या देखील सरकारने एक योजना चालू केली आहे तिचं नाव आहे पंतप्रधान पिक विमा योजना.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, यामुळे जर शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली तर त्यांना आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे विमा काढण्याचे अहवान सरकार करत आहे. या योजनेची शेवटची तारीख 31 जुलै होती पण आता सरकारने ही तारीख वाढवली आहे.
‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येऊ शकतो (Pik Vima)
शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख होती मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता शेतकऱ्यांना 16 ऑगस्ट पर्यंत पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी अर्ज करण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी यासाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या लॅपटॉप वरून किंवा फोन वरून अर्ज भरू शकता. तुम्हाला यासाठी www.pmfby.gov.in या ठिकाणी भेट देऊन सर्व स्टेप फॉलो करून अर्ज भरावा लागेल.
त्याचबरोबर तुम्ही Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करून याद्वारे देखील अर्ज भरू शकता. यासाठी तुम्हाला प्ले स्टोअर ला जाऊन हे ॲप इंस्टॉल करावे लागेल त्यानंतर ॲप इंस्टाल झाल्यानंतर सरकारी योजना या ऑप्शनमध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता यासाठी तुम्हाला कोणतीही पैसे द्यायची गरज नाही त्यामुळे लगेचच हे ॲप इंस्टॉल करा.
माहितीनुसार खरीप. हंगामातील भात, ज्वारी,मूग, उडीद, तूर, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, कापूस कारळे, तीळ आणि खरीप कांदा अशा एकूण 14 अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे
‘या’ योजनेचे नेमके उद्दिष्ट काय
आपत्तीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांची शेतामधील रुची कायम ठेवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान पिक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. बऱ्याचदा असं होतं की हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे जमीन दोस्त होते त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या सोडून दुसरा पर्याय दिसत नाही त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे