Good News : केवळ 1 रुपया भरून पीक विम्यासाठी अर्ज करता येणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी कृषी क्षेत्रासाठी अनेक मोठ्या घोषणा सरकारकडून करण्यात आल्या. यावेळी पीक विम्याबाबत (Pik Vima Yojana) फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता केवळ १ रुपया भरून पीक विम्यासाठी अर्ज करता येणार असल्याचे फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले आहे.

असा करा फक्त १ रुपया भरून पीक विम्यासाठी अर्ज

शेतकरी मित्रांनो आता पंतप्रधान पीक विम्यासाठी केवळ १ रुपया भरून अर्ज करता येणार आहे. यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असे सर्च करायचे आहे. Hello Krushi अँपच्या मदतीने शेतकरी कोणत्याही सरकारी योजनेला घरी बसून मोबाईलवरून अर्ज करू शकतो. तेव्हा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi हे मोबाईल अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

केंद्र सरकारच्या २०१६ च्या पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा हप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकऱ्याने भरण्याची तरतूद आहे. आता हा भाग सुद्धा शेतकऱ्यावर न ठेवता त्याच्या हिस्याचा पीक विमा राज्य सरकार भरेल अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली. शेतकरी केवळ १ रुपया भरून पंप्रधान पीक विमा पोर्टलवर नोंदणी करू शकेल असे फडणवीस यावेळी म्हणाले.

तसेच, २०१७ मध्ये लागू केलेल्या या योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतर्गत वेळेववर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. शिंदे-फडणवीस सरकारने या योजनेतर्गत १२.८४ लाख पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे. योजनेतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ४ हजार ६८३ कोटी रुपये थेट जमा करण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नमो योजनेचे ६ हजार रुपये मिळवण्यासाठी आजच करा हे काम

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेप्रमाणेच आता तुम्हाला नमो योजनेद्वारे वर्षाला ६ हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या. Hello Krushi अँपच्या मदतीने तुम्ही शासकीय योजनेला तुमच्या मोबाइलवरूनच अर्ज करू शकता. तेव्हा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी उशीर न करता आजच आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करून योजनेचे लाभार्थी बाणा.

  • गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करून हिरव्या रंगाचा लोगो असणारे Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करून घ्या.
  • आता मोबाईल नंबर, नाव, गाव आदी माहिती भरून Hello Krushi अँपला मोफत रजिस्टर करा.
  • यानंतर आता Hello Krushi ओपन करून होम पेजवरील सरकारी योजना या विभागात जा.
  • इथे तुम्हाला सर्व सरकारी योजनांची यादी दिसेल. यामध्ये तुम्हाला ज्या योजनेला अर्ज करायचा आहे ती योजना निवडा.
  • आता तुम्हाला सदर योजनेची सर्व माहिती दिसेल. यामध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर सर्वात शेवटी Apply Now या बटनावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत?

१) सातबारा, डिजिटल सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र अतिशय सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतात.
२) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने १ रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
३) सर्व सरकारी योजनांना मोबाइलवरूनच अर्ज करून लाभ घेता येतो.
४) आपल्या गावातील पुढील ४ दिवसांचा अचूक हवामान अंदाज समजतो.
५) आपल्या गावाजवळील सर्व खत दुकानदार यांना फोन करण्याची सोया
६) आपल्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
७) जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
८) शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्री करता येते.
९) राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचे बाजारभाव शेतकऱ्याला स्वतःला चेक करण्याची सुविधा आहे.

error: Content is protected !!