Pik Vima Yojana : पीक विम्या प्रश्नी मनसे आक्रमक; उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पॅड फेकून मारला!

0
3
Pik Vima Yojana MNS Aggressive
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी खरीप हंगामात (Pik Vima Yojana) दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांनाही फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी एसबीआय जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीच्या अंधेरी येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी पीक विम्याबाबत विचारणा केली असता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पॅड फेकून मारल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण (Pik Vima Yojana) निर्माण झाले होते.

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची (Pik Vima Yojana) रक्कम मिळालेली नाही. या प्रश्नी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एसबीआय जनरल इन्शुरन्स ऑफिस या अंधेरीस्थित कार्यालयाला भेट दिली. यावेळी मनसे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे, चेंबूर विधानसभा अध्यक्ष माऊली थोरवे आणि काही मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना पीक विमा प्रश्नी जाब विचारण्यात आला. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना वेळेत का मिळत नाही? असे मनसे पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकऱ्यांना विचारले असता, अपेक्षित उत्तर न मिळाल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर पॅड फेकून मारल्याची घटना घडली. तात्काळ माहिती मिळताच पोलिसांनी कार्यालयात उपस्थित होत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

मनसेचा अल्टिमेटम (Pik Vima Yojana MNS Aggressive)

मात्र हा पॅड संबंधीत अधिकऱ्यांना लागला नसल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटले असून, लातूर जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांमध्ये विमा कंपन्यांनी विम्याचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाही तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याचेही या वेळी मनसे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी म्हटले आहे. दरम्यान, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील 24 जिल्ह्यात 2216 कोटींचे अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आल्याची माहिती हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाला दिली होती. त्यापैकी 1 हजार 690 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून, 634 कोटी रुपयांचे वितरण वेगाने सुरू आहे, असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सभागृहात म्हटले होते. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने आज मनसे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.