हॅलो कृषी ऑनलाईन: द्राक्ष (Pink Berry In Grapes) बागेतील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीचे संतुलन बिघडते आणि मण्यातील हिरवे रंग गुलाबी रंगात बदलू शकते. यालाच गुलाबी मणी किंवा पिंक बेरी (Pink Berry In Grapes) असेही म्हणतात. अशी प्रकारची द्राक्षे निर्यात करता येत नाही. या विकृतीसाठी कोणतेही रासायनिक उपाय अद्याप उपलब्ध नसल्याने यासाठी प्रतिबंधात्मक उपाय (Preventive Measures) करणे गरजेचे असते. जाणून घेऊ या पिंक बेरी टाळण्याचे उपाय.
द्राक्ष बागेतील पिंक बेरी प्रतिबंधक उपाय (Pink Berry In Grapes)
- मण्याचे पाणी उतरण्याच्या अवस्थे आधी द्राक्षाचे घड पेपरने झाकल्यास (Paper Covering Of Grapes) कमाल आणि किमान तापमानातील तफावत कमी राहण्यास मदत होते त्यामुळे गुलाबी मणी ही विकृती टाळता येते. मात्र घड पेपरने झाकण्यापूर्वी बागेत मिली बग किडी आणि भुरी रोग नियंत्रित असल्याची खात्री करावी. कारण एकदा पेपर झाकल्यानंतर फळ काढणीच्या 5 ते 6 दिवस आधीच काढला जातो, तोपर्यंत तो तसाच झाकून ठेवलेला असतो. त्यामुळे किडी आणि रोगाचे नियंत्रण झाले नाही तर द्राक्ष फळे या प्रादुर्भावामुळे खाण्यायोग्य राहणार नाहीत.
- द्राक्ष घडावर जैविक कीड नियंत्रकाची फवारणी करून घड झाकावे.
- पिंक बेरी (Pink Berry In Grapes) टाळण्यासाठी बागेस रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे.
- बोदावर आच्छादन (Mulching) केल्यास मुळाच्या कक्षेतील तापमान वाढण्यास मदत होते.
- किमान तापमानात फारच कमी झाल्यास बागेत ठिकठिकाणी शेकोटी पेटवून धूर करावा, त्यामुळे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
- शक्य असल्यास बागेभोवती पडदे लावावेत.