Pink Potato Farming : अनेक शेतकरी बटाट्याची लागवड करून चांगला नफा कमवतात. मात्र आता तुम्ही जर बटाटा लागवडीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण आपल्याकडे सर्वच शेतकरी सामान्य बटाट्याची लागवड करतात. मात्र आता आम्ही अशा बटाट्या बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहोत त्याची लागवड केल्यानंतर तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला गुलाबी बटाट्या बद्दल माहिती सांगणार आहोत.
शेतकरी शेतीमध्ये जसे नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करतात तसे नवीन वाणांची लागवड करून देखील शेतकरी चांगले उत्पन्न कमवत आहेत. तसेच सामान्य बटाट्याच्या तुलनेत गुलाबी बटाट्याची शेती करणे देखील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण हा बटाटा दिसायला गुलाबी रंगाचा आणि याची चव देखील सामान्य बटाट्यापेक्षा चांगली आहे. यामुळे बाजारामध्ये या बटाट्याला मोठी मागणी असून त्याला बाजार भाव देखील चांगला मिळतो. हा बटाटा अधिक पौष्टिक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे कारण यामध्ये कार्बोहायड्रेट आणि स्टार्च चांगल्या प्रमाणात असतात.
बाजारात मोठी मागणी
तज्ञांच्या मते गुलाबी बटाटा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे बाजारामध्ये देखील याला मोठी मागणी आहे. आणि बाजारामध्ये मागणी वाढत असल्याने या बटाट्याला चांगला बाजार भाव मिळत आहे. परिणामी त्यामधून शेतकऱ्यांना चांगला नफा देखील राहत आहे. त्यामुळे याची मागणी जेवढी वाढेल तेवढा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
लागवड कशी करावी?
या बटाट्याच्या लागवडीचा तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्हाला तराई आणि डोंगराळ अशा दोन्ही ठिकाणी या बटाट्याची लागवड करता येणार आहे. त्यानंतर लागवडी केल्यानंतर पीक तयार होण्यासाठी जवळपास 80 ते 100 दिवस लागणार आहेत. या बटाट्याला बाजारात सामान्य बटाट्यापेक्षा जास्त बाजार भाव मिळतो. त्याचबरोबर तुम्हाला जर या बटाट्याचा बाजारभाव चेक करायचा असेल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपलेhello Krushi हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही बटाट्याचा दररोजचा बाजार भाव अगदी मोफत चेक करू शकता. त्यामुळे लगेचच हे ॲप इंस्टॉल करा.
आरोग्यासाठी फायदेशीर
तज्ञांच्या मते हा बटाटा सामान्य बटाट्याच्या तुलनेत आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे अनेक लोक याचे सेवन करतात. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याचे हा बटाटा काम करतो सामान्य बटाट्याच्या तुलनेत या बटाट्याची साठवणूक देखील जास्त दिवस करता येते. यामुळे या बटाट्याची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना खर्च कमी होऊन नफा देखील जास्त प्रमाणात राहतो. त्यामुळे तुम्ही देखील याची लागवड करून चांगला नफा कमवू शकता. तुम्हाला जर याची लागवड करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी तज्ञांकडून याविषयीची अधिकची माहिती घेऊ शकता.