हॅलो कृषी ऑनलाईन: राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना (Plastic Mulching Subsidy Scheme) राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत फळझाडांना, पालेभाज्या पिकांसाठी मल्चिंग म्हणून वापरण्यात येणारी प्लास्टिक फिल्मयावर अनुदान दिले जात आहे.
पिकात मल्चिंगचा वापर केल्यामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकते. पिकामध्ये तणांची वाढ देखील ही त्यामानाने कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा (Mulching Paper) उपयोग हा फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो. जाणून घेऊ या योजनेविषयी (Plastic Mulching Subsidy Scheme) माहिती.
प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी किती अनुदान असणार आहे? (Plastic Mulching Subsidy Scheme)
- अनुदान हे सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति हेक्टर रुपये 32,000 असून या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 16,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे कमाल दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंतच अनुदान देय आहे.
- जर डोंगराळ क्षेत्र असेल, तर प्रति हेक्टर हे 36,800/- रुपये मापदंड असणार आहे. या खर्चाच्या 50 टक्के म्हणजेच जास्तीत जास्त 18,400/- रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दोन हेक्टर क्षेत्र मर्यादितसाठी अनुदान देय असणार आहे.
योजनेसाठी कोण सहभागी होऊ शकते त्यासाठी आवश्यक पात्रता काय?
- शेतकरी
- बचत गट
- शेतकरी उत्पादक कंपनी
- शेतकरी समूह
- सहकारी संस्था या योजनेमध्ये सहभागी होऊन अर्थसहाय्य घेऊ शकतात.
प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना 2024 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्डची छायाप्रत
- आधार संलग्न असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स
- 7/12 उतारा
- 8-अ प्रमाणपत्र
प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेसाठी कोठे अर्ज करावा?
या योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी, यांच्याशी संपर्क करावा. या योजनेची अधिक माहिती मिळवावी.
विविध पिकांकरिता किती जाडीची आणि कोणती प्लास्टिक फिल्म वापरावी?
- ज्या पिकांना 11-12 महिने कालावधी लागतो. म्हणजे उदाहरणार्थ पपई यांसारख्या फळपिकांना – 50मायक्रोन जाडीची यु व्ही प्लास्टिक फिल्म वापरली जाते.
- 3-4 महिन्याच्या कालावधीत येणारे पिकांसाठी म्हणजेच उदाहरणार्थ भाजीपाला, स्ट्रॉबेरी इत्यादींसाठी – 25 मायक्रोन जाडीची यूवी स्टॅबिलायझर फिल्म वापरली जाते.
- जास्त कालावधी घेणारी पिके म्हणजेच 12 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी घेणाऱ्या सर्व पिकांसाठी – 100 किंवा 200 मायक्रॉन जाडीची यु व्ही स्टॅबिलायझर प्लास्टिक फिल्म वापरली जाते.