PM Crop Insurance Scheme: प्रधानमंत्री पीक विमा अर्जासाठी मिळाली आहे ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ!

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: प्रधानमंत्री पीक विमा योजने (PM Crop Insurance Scheme) अंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत आज 15 जुलै पर्यंत होती, मात्र राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही काही कारणामुळे पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ (Extension Of Time) मिळावी अशी मागणी राज्याकडून केंद्र सरकारला (Central Government) करण्यात आली होती. त्यामुळे विमा अर्जासाठी (PM Crop Insurance Scheme) सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.

सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थीची कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अर्ज व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्याप ही अनेक शेतकरी पिक विमा योजनेपासून (PM Crop Insurance Scheme) वंचित आहे त्यामुळे पिक विम्याचा अर्ज (Crop Insurance Application) करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला. तसेच राज्यात काही ठिकाणी समाधानकारक पाऊस नव्हते झाले त्यामुळे शेतकरी खरीप पिकांची पेरणी (Kharif Crop Sowing) करावी की नाही या मनस्थितीत होते, त्यामुळे अशा काही शेतकर्‍यांनी सुद्धा पीक विम्यासाठी अर्ज केलेला नव्हता. या विविध कारणांच्या पार्श्वभूमीवर आता शेतकर्‍यांना 31 जुलैपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज करायची तारीख वाढवून देण्यात आली होती.

दरम्यान, कृषी विभागाच्या (Agriculture Department) अद्ययावत माहितीनुसार, राज्यात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत म्हणजे 15 जुलै सकाळीपर्यंत 1 कोटी 36 लाख शेतकर्‍यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला होता. राज्यात अनेक भागांत मॉन्सूनचा पाऊस उशिराने (Late Monsoon) पडल्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या पेरण्या राहिल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा (PM Crop Insurance Scheme) भरता आला नाही. मुदतवाढ दिल्यामुळे या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. 

मागच्या वर्षीच्या हंगामात राज्यातील जवळपास 1 कोटी 70 लाख शेतकर्‍यांनी एक रूपयात पीक विमा योजनेचा (PM Crop Insurance Scheme) लाभ घेतला होता. तर मागच्या हंगामात 1 कोटी 13 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित होते. यंदाही जास्तीत जास्त क्षेत्र विमा संरक्षित करण्याचे ध्येय कृषी विभागाने ठेवले आहे.