PM Kisan : 13 वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; अखेर मुहूर्त ठरला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान (PM Kisan) निधीचे आत्तापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता कधी जमा होणार याबाबत मागील महिन्यापासून शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. १३ वा हप्ता जमा करण्यापूर्वी अपात्र शेतकऱ्यांची नवे योजनेच्या यादीतून काढण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज असून १३ वा हप्ता जमा होण्याचाही तारीख अखेर फायनल झाल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान मोदी लवकरच याबाबत निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर योजनेची रक्कम जमा करतील अशी माहिती आहे.

आजच हे काम करा अन्यथा १३ वा हप्ता मिळणार नाही

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ६००० रुपये पाठवत असते. योजनेचा १३ वा हप्ता मिळवण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्या. इथे पंतप्रधान किसान सन्मान योजनेबाबतचे सर्व अपडेट तुम्हाला वेळच्यावेळी दिले जातात. तसेच या अँपवरून तुम्ही तुमचे नाव या यादीत आहे का ते चेक करू शकता. तेव्हा आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून योजनेचे लाभार्थी बना.

जे शेतकरी आयकर भारतात तसेच ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण नाहीत अशांना आता पीएम किसान योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशातील लाखो शेतकऱ्यांची नावे १३ व्या हप्त्यातून वगळण्यात आली असून काही शेतकऱ्यांकडून रक्कम वसूल करण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. तेव्हा तुम्ही आजच जर अजून इकेवायसी केलेली नसेल तर Hello Krushi मोबाईल अँप वरून आजच सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

24 फेब्रुवारीला खात्यात हप्ता येऊ शकतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली. येत्या २४ फेब्रुवारीला या योजनेला ४ वर्षे पूर्ण होणार आहेत. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, 24 फेब्रुवारीला केंद्र सरकारच्या खात्यात निधी जमा होऊ शकतो. मात्र, २४ फेब्रुवारीला हप्ता जारी करण्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अधिकृत घोषणेची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.

लाभार्थ्यांची संख्या 10.45 कोटी झाली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 वा हप्ता पाठवला होता. त्याचा फायदा करोडो शेतकऱ्यांना झाला. केंद्र सरकारकडून संसदेत माहिती देण्यात आली आहे. 2019 मध्ये पीएम किसानच्या लाभार्थ्यांची संख्या 3.16 कोटी होती, जी 2022 मध्ये वाढून 10.45 कोटी झाली आहे. पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने अपात्रांना यादीतून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे.

याप्रमाणे पोर्टलवर अपडेट करा

शेतकऱ्यांना प्रथम प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. यामध्ये लाभार्थी दर्जा, ई-केवायसी आणि इतर पर्याय दिले जातील. जर ई-केवायसी करायचे असेल, तर तुम्ही या पर्यायावर क्लिक करून ई-केवायसी पूर्ण करू शकता. नवीन शेतकऱ्याची नोंदणी करायची असली तरी शेतकऱ्यांसाठी पर्याय देण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांची माहिती लाभार्थी स्थिती, लाभार्थी यादीतून मिळू शकते. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये पाठवते. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला ६ हजार रुपये पाठवले जातात.

error: Content is protected !!