PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 16,800 कोटी रुपये; तुमचे नाव आहे का ते असे करा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पंतप्रधान मोदी सध्या कर्नाटक दौऱ्यावर असून यावेळी बेळगाव येथून पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 16 हजार 800 कोटी रुपये इतकी रक्कम पाठवण्यात येणार आहे. शेतकरी अनेक दिवसांपासून 13 व्या हप्त्याची वाट पाहत होते. आता आज बँक खात्यावर पैसे जमा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

PM Kisan Yojana चा हप्ता मिळवण्यासाठी आजच करा हे काम

शेतकरी मित्रांनो तुम्हाला सरकारच्या योजनेचे पैसे खात्यावर मिळवायचे असतील तर तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप असणे अतिशय गरजेचे आहे. इथे तुम्हाला सरकारी योजनेबाबत सखोल माहिती देण्यात येते. तसेच सरकारी पातळीवर काहीही बदल झाला अन तुमचं कागदपत्र अपडेट करायचे असल्यास इथे तुम्हाला कळवण्यात येते. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या अँप वरून सोप्प्या पद्धतीने Online अर्ज करू शकता. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं नाव टाईप करून हे अँप इंस्टॉल करून घ्या.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (पीएम किसान योजना) लाभार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. देशातील कोट्यवधी शेतकरी 13व्या हप्ता कधी जमा होणार याच्या प्रतीक्षेत होते. आज अखेर प्रतीक्षा संपली असून पंतप्रधान मोदी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16,800 कोटी रुपये जमा करणार आहेत. याबाबतची माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट करून दिली आहे.

दरवर्षी 6000 रुपये दिले जातात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. ही योजना फेब्रुवारी, 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती, परंतु ती डिसेंबर 2018 पासून लागू होईल असे मानले जात होते.

किती वाजता जमा होणार योजनेचे पैसे?

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी ३ वाजता बेळगाव येथील एका आयोजित कार्यक्रमात १३ व्या हप्त्याचे पैसे वर्ग केले जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर १६ हजार ८०० कोटी रुपये पाठवले जाणार आहेत.

कृषीमंत्र्यांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत

पंतप्रधान मोदी कर्नाटकातील बेलगावी येथे आयोजित कार्यक्रमात पीएम-किसान योजनेचा 13 वा हप्ता जारी करणार आहेत. पीएम किसान आणि जल जीवन मिशनच्या लाभार्थ्यांसह सुमारे एक लाख लोक या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. यावेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि कृषी सचिव मनोज आहुजा उपस्थित राहणार आहेत.

किती हप्ते निघाले

पीएम-किसान योजनेचा 11वा हप्ता मे 2022 मध्ये जारी करण्यात आला होता तर 12वा हप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये जारी करण्यात आला होता. या योजनेंतर्गत आतापर्यंत 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना एकूण 2.25 लाख कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्यात आली आहे. यापैकी 1.75 लाख कोटी रुपये कोविड-19 काळात शेतकऱ्यांना अनेक हप्त्यांमध्ये देण्यात आले.

यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ते आम्ही तुम्हाला सांगतो –

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi या नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या.
  • आता तुमचे नाव, मोबाईल नंबर आदी माहिती भरून Hello Krushi अँप ला मोफत रजिस्ट्रेशन करा.
  • Hello Krushi ओपन केल्यानंतर आता होम पेजवर सरकारी योजना या विभागात जा.
  • सरकारी योजना विभागात गेल्यानंर तुम्हाला इथे सर्व शासकीय योजना दिसतील. यामधील पीएम किसान योजनेवर क्लिक करा.
  • यामध्ये Apply Now वर क्लिक करा
  • आता होम पेजवर डॅश बोर्डवर क्लिक करा.
  • यानंतर तुमचे राज्य, जिल्हा आणि गाव निवडा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर लिस्ट ओपन होईल.
  • यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत?

१) सातबारा, डिजिटल सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र अतिशय सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतात.
२) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने १ रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
३) सर्व सरकारी योजनांना मोबाइलवरूनच अर्ज करून लाभ घेता येतो.
४) आपल्या गावातील पुढील ४ दिवसांचा अचूक हवामान अंदाज समजतो.
५) आपल्या गावाजवळील सर्व खत दुकानदार यांना फोन करण्याची सोया
६) आपल्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
७) जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
८) शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्री करता येते.
९) राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचे बाजारभाव शेतकऱ्याला स्वतःला चेक करण्याची सुविधा आहे.

error: Content is protected !!