PM Kisan: 13व्या हप्त्याचा लाभ घ्यायचाय ? ‘ही’ कागदपत्रे तयार करा, नाहीतर खात्यात पैसे नाही येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर रोजीच ‘पीएम किसान सन्मान निधी’ (PM Kisan) योजनेचा 12 वा हप्ता जारी केला. यावेळी देशातील सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वर्ग करण्यात आले. यासाठी सरकारला 16 हजार कोटी रुपये खर्च करावे लागले. त्याचवेळी, आता शेतकरी पीएम किसानच्या 13व्या हप्त्याची प्रतीक्षा करू लागले आहेत. पण 13व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही खास माहिती जाणून घेतली पाहिजे, कारण सरकारने PM किसान बद्दल एक मोठा अपडेट दिला आहे. जर तुम्ही या नवीन अपडेट अंतर्गत नवीन नियमांचे पालन केले नाही तर तुम्ही 13 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता.

तुम्हालाही पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल. आता शेतकऱ्यांना नोंदणी करताना रेशनकार्डची कॉफीही ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे पीएम किसानच्या वेबसाइटवर रेशन कार्डची कॉफी अपलोड करण्यापूर्वी त्याची पीडीएफ तयार करावी लागेल. यासोबतच ई-केवायसीही अनिवार्य करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही रेशन कार्डची कॉपी अपलोड केल्यानंतर आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच 13व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकता.

पीएम योजनेचा फायदा अपात्र शेतकरी घेतात

आत्तापर्यंत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना स्वतःची नोंदणी करण्यासाठी (PM Kisan) आधार कार्ड, बँक पासबुक, खतौनी आणि घोषणा फॉर्मची हार्ड कॉपी जमा करावी लागत होती. मात्र आता सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया थांबवली आहे. आता शेतकऱ्यांना हार्ड कॉपीऐवजी फक्त सॉफ्ट कॉपी जमा करावी लागणार आहे. यामुळे सरकारला बनावट लाभार्थी ओळखण्यास मदत होईल. कारण दरवर्षी लाखो अपात्र शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा खोट्या मार्गाने लाभ घेतात.

error: Content is protected !!