PM Kisan : मोठी बातमी ! ई -केवायसी करण्याच्या मुदतीत आणखी वाढ होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 55 ते 60 टक्के लोकसंख्येसाठी शेती (PM Kisan) हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे. येथील अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. PM किसान योजना ही शेकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असून अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेत पारदर्शकता यावी याकरिता ई -केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट होती मात्र आता ती आणखी वाढवण्यात येऊ शकते.

मराठवाडा विभागाच्या माहिती आणि जनसंपर्क खात्यानुसार एक ट्विट करण्यात आले आहे. त्यानुसार ई -केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवण्याच्या कृषी मंत्री सत्तार यांच्या मागणीला केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांच्याकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी ई -केवायसी
केले नाही त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. मात्र अद्याप पीएम किसान च्या वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

कसे कराल ई केवायसी

–सर्वप्रथम पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
–येथे तुम्हाला फार्मर कॉर्नर दिसेल, जिथे E-KYC टॅबवर क्लिक करा.
–आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
–आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
–सबमिट OTP वर क्लिक करा.
–आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल.

Leave a Comment

error: Content is protected !!