PM Kisan Mandhan Scheme : ‘या’ शेतकऱ्यांना वर्षाला 36 हजार रुपये मिळणार; कृषिमंत्र्यांची माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “वृद्धापकाळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान मानधन योजना (PM Kisan Mandhan Scheme) राबवली जात आहे. आतापर्यंत देशातील 23 लाख 38 हजार 720 शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान मानधन योजनेत सहभाग नोंदवला आहे. या सर्व शेतकऱ्यांना वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3000 रुपये मासिक याप्रमाणे वर्षाला 36 हजार रुपये इतकी पेन्शन (PM Kisan Mandhan Scheme) दिली जाणार आहे.” अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत दिली आहे.

लोकसभेत कृषीमंत्र्यांचे उत्तर (PM Kisan Mandhan Scheme For Farmers)

लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी ही माहिती दिली आहे. या योज़नेच्या लाभार्थ्यांची नोंदणी ही डिजिटल सेवा केंद्र आणि राज्य सरकारांकडून केली जात आहे. ही योजना प्रामुख्याने देशातील लहान आणि अल्प शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळातील सुरक्षा आणि त्याच्या म्हातारपणातील सामाजिक सुरक्षेसाठी सुरु करण्यात आली आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहे.

काय आहे पीएम किसान मानधन योजना?

पंतप्रधान किसान मानधन योजना ही 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरु करण्यात आली असून, ती देशातील लहान आणि अल्प-भूधारक शेतकऱ्यांना मासिक पेन्शन देण्याची योजना आहे. यामध्ये वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळेल. म्हणजेच तुम्हाला एका वर्षात 36,000 रुपये मिळतील. साधारणपणे 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी यामध्ये नोंदणी करू शकतो. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार दर महिन्याला या योजनेत पैसे जमा करावे लागतील. यामध्ये 55 ते 200 रुपयांपर्यंतचे पैसे जमा करता येतात. तर वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन दिली जाते.

सर्वाधिक नोंदणी कर्नाटकात

केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत आकडेवारी सादर करताना म्हटले आहे की, ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत कर्नाटक या राज्यातील सर्वाधिक 41,683 शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी जितकी रक्कम जमा तितकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. 31 जानेवारी 2024 पर्यंत कर्नाटकातील शेतकऱ्यांनी 10,78,51,700 रुपये या योजनेअंतर्गत जमा केले आहे. असेही कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी लोकसभेत म्हटले आहे.

error: Content is protected !!