PM Kisan Samman Nidhi Yojana: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता गमावणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात 4000 रुपये!

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील दोन हप्ते गमावलेल्या शेतकऱ्यांनाही (Farmers Missed Installment) यावेळी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ मिळू शकतो. सूत्रांच्या मते, सरकार अशा शेतकऱ्यांची यादी तयार करीत असून त्यांच्या खात्यात एकाचवेळी दोन्ही हप्ते जमा करण्याचा विचार करीत आहे. याचा अर्थ, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये थेट जमा होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) वाराणसीला भेट दिल्यानंतर 17 वा हप्ता 9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. मात्र, अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते. सरकारचा आताचा निर्णय या शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरू शकतो.

या योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 18 वा हप्ता (Pm Samman Nidhi Installment) ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे. सरकारने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी अधिक माहितीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधता येतो.

शेवटची तारीख

शेतकऱ्यांनी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जर अद्याप कोणीही शेतकरी eKYC केलेले नसेल त्यांनी ते तात्काळ करून घ्यावे. तसेच, भुलेख पडताळणी (Verification) आणि बँक खाते आधारशी जोडणेही आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत ‘ही बातमी तुम्हाला माहित आहे का?