PM KISAN SCHEME : महत्त्वाची बातमी…! ‘या’ तारखेला बँक खात्यात येणार 12 व्या हप्त्याचे पैसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम किसान सन्मान निधी (PM KISAN SCHEME) योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित करते. तुम्हीही 12व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. तुम्‍हीही पीएम किसान योजनेच्‍या पैशाची वाट पाहत असाल तर ३१ जुलै पूर्वी तुम्हाला एक महत्वाचे काम करावे लागेल नाहीतर या योजनेचा १२ हप्ता तुम्हाला मिळणार नाही.

बाराव्या हप्त्याचे पैसे कधी येणार?

पीएम किसान योजनेअंतर्गत (PM KISAN SCHEME) १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीसाठी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम दिली जाते. त्याच वेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केले जातात.याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात. यावेळी, पीएम किसान योजनेच्या 11व्या हप्त्याचे पैसे पीएम मोदींनी 31 मे 2022 रोजी शिमला येथे हस्तांतरित केले.आता अशी माहिती मिळत आहे की 2022 च्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 सप्टेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

31 जुलै पूर्वी ई-केवायसी करा

अनेक अपात्र लोक या सरकारी योजनेचा लाभ घेत होते, त्यामुळे सरकारने सर्वांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. जर तुम्ही आत्तापर्यंत KYC केले नसेल तर तुमच्या खात्यात 12 व्या हप्त्याचे पैसे येणार नाहीत.ई-केवायसी शिवाय तुमचा 12 वा हप्ता अडकेल. यासाठी तुम्ही ३१ जुलै २०२२ पूर्वी ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाइन केवायसी प्रक्रिया घरी बसून पूर्ण करू शकता.

eKYC कसे करावे ?

–ई-केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
–तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्‍यात E-KYC चा पर्याय दिसेल.
–तुम्हाला या E-KYC वर क्लिक करावे लागेल.
–आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
–यानंतर तुम्हाला इमेज कोड टाकावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
–आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि OTP भरावा लागेल.
–यानंतर, तुमचे सर्व तपशील पूर्णपणे वैध असल्यास, तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.
–जर तुमची प्रक्रिया बरोबर नसेल तर invalid असे लिहिले जाईल.
–तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊन हे दुरुस्त करू शकता.(PM KISAN SCHEME)

Leave a Comment

error: Content is protected !!