PM Kisan : ई-केवायसी साठी केवळ एक दिवस बाकी; योजनेअंतर्गत 1 ते 10 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. आता शेतकरी या जोजनेच्या १२ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना ई – केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले असून त्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत 1 ते 10 ऑगस्ट 20222 पर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.

काय आहे ही विशेष मोहीम ?

या मोहीमेअंतर्गत 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.यामध्ये नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी करणे, आधार कार्ड बॅंक खात्याशी जोडणे, एकूण लाभार्थ्यांच्या 10 टक्के व स्वयंनोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची 100 टक्के तपासणी कृषी मित्रांमार्फत करण्यात येणार आहे.

याद्या गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर

–या मोहिमेच्या माध्यमातून ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येणार आहेत.
–या याद्या चावडीवर अथवा ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात येणार आहेत.
— प्रलंबित यादीतील लाभार्थ्यांना पोलीस पाटील, कोतवाल व सरपंच यांच्यामार्फत संपर्क करुन ई-केवायसी पूर्ण करण्याचे महत्व व कार्यपद्धती समजावण्यात येईल व मोबाईलद्वारे प्रक्रीया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
–नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन 31 जुलै 2022 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्यात येईल.

काय आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश ?

कृषीमित्रांनी आत्मा योजनेचे बीटीएम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष गावात जाऊन 7/12 उतारा, आधारकार्ड, बँक खाते पासबुक आदी कागदपत्रे संबंधीत शेतकऱ्यांकडून प्राप्त करुन घेत संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून प्रपत्र- 1 प्रमाणित करुन घ्यावे. याच पद्धतीने स्वयंनोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची 100 टक्के तपासणी कृषी मित्रांद्वारे करण्यात यावी. या कामावर देखरेख व काम करुन घेण्याची जबाबदारी तालुकास्तरीय समितीची राहील, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. गटविकास अधिकाऱ्यांनी वंचित नविन लाभार्थी यादीस 15 ऑगस्ट 2022 च्या ग्रामसभेत विशेष बाब म्हणून मान्यता घ्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!