PM Kisan: हे काम पूर्ण करा, अन्यथा खात्यात येणार नाही 13 वा हप्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम-किसान (PM Kisan) योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत त्यांची ई-केवायसी पडताळणी करावी लागेल. 31 डिसेंबर 2022 पर्यंत ई-केवायसी पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे, जेणेकरून त्यांना योजनेतील सर्व लाभ सहज मिळू शकतील. ई-केवायसी पडताळणी नाही झाली तर पीएम किसानचा पुढील हप्ता मिळू शकणार नाही.

 ई-केवायसी 

यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-मित्र केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने आधार कार्डद्वारे ई-केवायसी पडताळणी पूर्ण करावी लागेल. सर्व ई-मित्र (PM Kisan) केंद्रांवर ई-केवायसीसाठी शुल्क 15 रुपये प्रति लाभार्थी (करांसह) निश्चित केले आहे. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतरच या योजनेत येणाऱ्या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल.

वेबसाईट च्या माध्यमातून कसे कराल ई केवायसी

–सर्वप्रथम पीएम किसान (PM Kisan) योजनेच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
–येथे तुम्हाला फार्मर कॉर्नर दिसेल, जिथे E-KYC टॅबवर क्लिक करा.
–आता एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
–आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरील क्रमांकावर OTP पाठवला जाईल.
–सबमिट OTP वर क्लिक करा.
–आधार नोंदणीकृत मोबाइल ओटीपी प्रविष्ट करा आणि तुमचे ई-केवायसी केले जाईल.

येथे संपर्क करा

तुम्हाला पीएम किसान योजनेबद्दल (PM Kisan Yojana) काही माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही [email protected] या अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता.

दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात

पीएम किसान (PM Kisan) योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम दर चार महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना पाठवली जाते. शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळाले आहेत. पुढील हप्ता आता तीन महिन्यांनंतरच मिळणार आहे.

error: Content is protected !!