PM Kisan Yojana : तुम्हाला पीएम किसानचा 13 वा हप्ता मिळणार का? या सोप्या पद्धतीने चेक करा तुमचे नाव आहे का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । केंद्र सरकार पीएम किसान योजनेद्वारे (PM Kisan Yojana) शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दर वर्षी ६ हजार रुपये पाठवते. आत्तापर्यंत सरकारने १२ हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत. आता काही दिवसांतच पीएम किसानचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र १३ वा हप्ता जमा होण्यापूर्वी सरकार शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करून अपात्र शेतकऱ्यांची नावे कमी करणार आहे. तुम्हाला १३ वा हप्ता मिळणार कि नाही हे कसे तपासायचे याबाबत आम्ही तुम्हाला खाली माहिती देणार आहोत.

PM Kisan Yojana चा हप्ता मिळवण्यासाठी हे काम आजच करा

शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देत आहे. अलीकडे या योजनेसाठी अपात्र शेतकरी कोणते हे शोधून सरकार त्यांच्यावर कारवाई करत आहे. यासाठी तुमच्या मोबाईलवर आजच गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या. इथे तुम्हाला सर्व सरकारी योजनांना मोबाईलवरून अर्ज करण्याची सुविधा आहे. तसेच PM Kisan योजनेबाबतचे सर्व अपडेट तुम्हाला इथे दिले जातात. त्यासोबत रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज याची माहिती अँपवर शेतकरी स्वतः चेक करू शकतो. तसेच सातबारा उतारा, जमीनीचा नकाशा आदी कागदपत्र सोप्या पद्धतीने डाउनलोड करण्याची सुविधा अँपवर आहे. शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्री सेवासुद्धा Hello Krushi अँप वर देण्यात आली आहे. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोवरून Hello Krushi अँप डाउनलोड करून याचे लाभार्थी बना.

तुम्ही 13व्या हप्त्यासाठी पात्र आहात का?

जे शेतकरी आयकर भरतात अशांना आता पीएम किसानच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप इकेवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशांनासुद्धा सरकार लाभार्थी यादीतून कमी करणार आहे. तेव्हा जर तुम्ही अद्याप इकेवायसी केली नसेल तर आजच हि प्रक्रिया पूर्ण करून घ्या. अनेक शेतकरी अपात्र असूनदेखील पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते. मात्र आता केंद्र सरकारने अशा शेतकऱ्यांवर कठोर पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का?

आता १३ वा हप्ता आपल्याला मिळणार का हे चेक करणे अतिशय सोपे झाले आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये सरकारी योजनेत तुम्हाला पीएम केसांच्या सर्व अपडेटची माहिती दिली जाते. तसेच इथून तुम्ही लाभार्थी यादी चेक करून तुम्हाला १३ वा हप्ता मिळणार काय ते पाहू शकता.

शेतकरी येथे संपर्क करू शकतात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याबाबत, शेतकरी अधिकृत ईमेल आयडी [email protected] वर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर देखील संपर्क साधू शकता. येथे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटू शकतात.

error: Content is protected !!