हॅलो कृषी ऑनलाईन । देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. ताज्या अपडेटनुसार, जानेवारी महिन्यातील कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये (PM Kisan Yojana) येऊ शकतात. ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकर्यांकडे वर्ग करण्यात येणार आहे. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हप्ते जमा झाले आहेत. शेतकरी 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. PM Kisan Yojana 13th Installment Date
त्यापूर्वी अजून एक महत्वाची गोष्ट आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.
पीएम किसान योजनेची (PM Kisan Yojana) रक्कम या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकते अशी माहिती आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ६ हजार रुपये हस्तांतरित केले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांच्या अंतराने तीन हप्त्यांमध्ये वर्ग केली जाते. 2022 मध्ये 1 जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर 9वा हप्ता पाठवण्यात आला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये पाठवून भारत सरकार भेट देऊ शकेल, अशी आशा आहे.
PM Kisan Yojana लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होणार?
जमिनीच्या नोंदींच्या पडताळणीला वेग आला असून, त्यात नवीन खुलासे होत आहेत. असे मानले जाते की 12 व्या हप्त्याप्रमाणेच 13 व्या हप्त्यामध्ये देखील लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते. 12 व्या हप्त्यादरम्यान, एकट्या उत्तर प्रदेशातील एकूण 21 लाख लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली. इतर राज्यांतही अशीच स्थिती होती. तुम्ही अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास, शक्य तितक्या लवकर अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि ती अपडेट करा.
शेतकरी येथे संपर्क करू शकतात
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 13व्या हप्त्याबाबत, शेतकरी अधिकृत ईमेल आयडी [email protected] वर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर देखील संपर्क साधू शकता. येथे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटू शकतात.