हॅलो कृषी ऑनलाईन । पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) 13व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. मोदी सरकार लवकरच करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा करू शकते असे समजत आहे. सुमारे 2 कोटी लोकांना पीएम किसानचा 12 वा हप्ता मिळालेला नव्हता. लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदी केंद्रीय डेटाबेसमध्ये अद्ययावत न केल्यामुळे या शेतकऱ्यांना पूर्वीचा हप्ता मिळू शकला नाही. आता पीएम किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याबाबत मोठा अपडेट समोर आला आहे. 2,000 रुपये मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी दोन दिवसांत एक महत्वाचे काम करणे गरजेचे आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जाणार आहेत.
13 व्या हप्ता मिळवण्यासाठी आजच करा हे महत्वाचे काम
शेतकरी मित्रांनो केंद्र सरकार काही दिवसांतच पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. मात्र सरकार दरवेळी काही नवीन अपडेट देऊन शेतकऱ्यांची नावे कमी करत असते. तुम्हाला १३ व्या हप्त्याचे पैसे वेळेवर मिळवायचे असतील तर आजच तुमच्या मोबाईलवरून एक छोटेसे काम करून घ्या. आताच मोबाईलवरील गुगल ले स्टोअरला जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप इन्स्टॉल करा. इथे तुम्हाला PM Kisan योजनेबाबतचे सर्व अपडेट सर्वात अगोदर मिळतात. तसेच तुम्ही या अँपवरूनच सरकारच्या नव्या नियमांची पूर्तता करून योजनेचे पैसे मिळण्यासाठी अर्ज करू शकता. आजच Hello Krushi इन्स्टॉल करून सेवेचे लाभार्थी बना.
पीएम किसान योजनेअंतर्गत, सर्व जमीनधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये देय असलेले वार्षिक 6,000 रुपये आर्थिक लाभ दिले जातात. यंदाचा 13 वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे. मात्र हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी 28 जानेवारीच्या आगोदरच इकेवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. अन्यथा ज्या शेतकऱ्यांची इकेवायसी नाही अशांना १३ वा हप्ता मिळणार नाही.
ई केवायसी दोन प्रकारे करा
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई केवायसी केलेले नाही, ते शेतकरी पीएम किसानसाठी दोन प्रकारे ई केवायसी पूर्ण करू शकतात. हे काम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटद्वारे घरी बसून ऑनलाइन केले जाऊ शकते. याशिवाय जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊनही शेतकरी त्यांचे ई-केवायसी करू शकतात. जर शेतकऱ्याने स्वत: OTP द्वारे ई-केवायसी केले तर तुम्हाला कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. तसेच शेतकरी Hello Krushi या मोबाईल अँपवरूनही सरकारी योजनेसाठी पैसे खर्च न करता अर्ज करू शकतात.