PM Kisan Yojana : 13 व्या हप्त्याबाबत केंद्र सरकारकडून मोठी अपडेट जारी; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan Yojana 13th Instalment : केंद्र सरकार पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी म्हणून कोट्यवधी रुपये पाठवत असते. आत्तापर्यंत एकूण 12 हप्ते सरकरने पाठवले असून आता शेतकरी 13 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 13 व्या हप्त्याबाबत सरकारकडून एक मोठी अपडेट जरी करण्यात आली आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना इकेवायसी करण्यासाठी सरकारने वेळ दिला आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 13 वा हप्ता सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे समजत आहे. मात्र काही शेतकऱ्यांना या हप्त्यापासून वंचित करण्यात आले आहे. कोणत्या शेतकऱयांना या हप्त्यापासून वंचित करण्यात येणारे हे आपण खाली जाणून घेणार आहोत.

PM Kisan योजनेचे पैसे मिळवायचे असतील तर हे काम करा

शेतकरी मित्रांनो सध्या सरकार लाखो शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसाठी अपात्र ठरवून त्यांच्या खात्यावर येणारे पैसे बंद करत आहे. मात्र यापासून वाचण्यासाठी तुम्ही आजच Hello Krushi नावाचे अँप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. इथे सरकारच्या सर्वच योजनांची अगदी सोप्या भाषेत माहिती दिली आहे. तसेच मोबाइलवरूनच तुम्ही कोणत्याही योजनेला अर्ज करू शकता. यामुळे सरकारकडून येणाऱ्या प्रत्येक अपडेटबाबत तुम्हाला इथे माहिती देण्यात येते. तसेच तुम्ही Hello Krushi अँप वरूनच पात्रतेसाठी असलेल्या गोष्टींची पूर्तता करू शकता. आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप डाऊनलोडकरून योजनेचे लाभार्थी बना.

12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. आता शेतकरी 13 वा हप्ता येण्याची वाट पाहत आहे. 13वा हप्ता कोणत्याही परिस्थितीत अपात्र व्यक्तीच्या खात्यात पोहोचणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात तेरावा हप्ता न येण्याची भीती आहे. मात्र, जे शेतकरी पात्र आहेत आणि ज्यांचे अपग्रेडेशन पूर्ण झाले आहे, त्यांच्या खात्यात 13 वा हप्ता कोणत्याही परिस्थितीत पोहोचेल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे.

NPCI शी आधार लिंक करा, अन्यथा तुम्हाला हप्ता मिळणार नाही

हप्ता मिळण्यासंदर्भात आणखी एक मोठे अपडेट आहे. शेतकऱ्यांनी NPCI शी आधार लिंक करणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. याबाबत सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 2.33 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा हप्ता थांबू शकतो. या शेतकऱ्यांनी अद्याप बँकांमार्फत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) शी आधार लिंक केलेले नाही. या संदर्भात कृषी विभाग आता शेतकऱ्यांना प्रबोधन करत आहे. सरकारने 31 जानेवारीपर्यंत सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांचे ई-केवायसी आणि आधार बँक आणि एनपीसीआयशी लिंक करण्यास सांगितले आहे.

2 कोटी शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही

अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे न पाठवण्याबाबत केंद्र सरकार आग्रही आहे. तसेच पात्र शेतकऱ्याच्या खात्यात 13 वा हप्ता लवकरात लवकर पोहोचावा, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता 2 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचला नाही. यातील अनेक शेतकरी खरोखरच अपात्र होते, तर अनेक शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नव्हते.

error: Content is protected !!