PM Kisan Yojana : सध्या सर्वजण शेतकरी पीएम किसान निधीच्या 14 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. पीएम मोदी 28 जुलै रोजी 18 हजार कोटी रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करू शकतात. अशी माहिती समोर आली आहे.
तुम्ही या हप्त्याची वाट पाहत असाल, तर लवकरच ई-केवायसी करा. जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केले नसेल तर तुम्ही 14व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता. या योजनेचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत. ही योजना अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी बनवण्यात आली होती, मात्र नंतर सर्व शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
शेतीच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकणार्या छोट्या शेतकर्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. पेरणीपूर्वीच या रोख रकमेतून बी-बियाणे, खते आदी खरेदी करण्यात शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे. (PM Kisan Yojana)
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सरकारी योजनांची माहिती अगदी मोफत आणि सोप्या पद्धतीने जाणून घ्याची असेल तर लगेचच प्ले स्टोअरवर जा आणि Hello Krushi हे अँप इंस्टाल करा. यामध्ये तुम्हाला सरकारी योजनांबरोबर, बाजारभाव, हवामान अंदाज, पशूंची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींची अगदी मोफत माहिती मिळेल.
ई-केवायसी लवकरात लवकर करा
14व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच ई-केवायसी करावे लागेल. जर ई-केवायसी केली नाही तर बँक खात्यात पुढील हप्ते जमा होणार नाहीत. ई-केवायसी करण्यासाठी शेतकरी त्यांच्या जवळच्या CSC ला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. याशिवाय जमिनीच्या नोंदींचे प्रमाणीकरणही आवश्यक आहे. जवळच्या कृषी कार्यालयामध्ये जाऊन शेतकरी हे काम पूर्ण करू शकतात. अर्ज भरताना सावधगिरी बाळगा, नाव, पत्ता, लिंग, आधार क्रमांक, खाते क्रमांक इत्यादींमध्ये झालेली चूक सुद्धा तुमचा हप्ता लांबवू शकते.