PM Kisan योजनेचे पैसे खात्यात आले नाहीत? आजच करा हे काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 13 वा हप्ता जारी होऊन 19 दिवस झाले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर 16 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांना १३ वा हप्ता अद्यापपर्यंत मिळू शकलेला नाही. १३ वा हप्ता जमा करण्यापूर्वी केंद्र सरकारे अपात्र शेतकऱ्यांची यादी करून त्यांना योजनेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रांची योग्य पूर्तता न झाल्याने १३ वा हप्ता मिळू शकलेला नाही.

आज आम्ही तुम्हाला १३ वा हप्ता मिळाला नसेल तर काय करायचे याबाबत माहिती देणार आहोत. पीएम किसान योजनेसाठी अर्ज करताना बँक खाते, आधार क्रमांकाची अचूक माहिती न भरल्यामुळे तुमचे पैसे जमा होण्यास व्यत्यय येण्याची शक्यता असते. तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करा. तसेच जर माहिती भरताना तुमच्याकडून काही चूक झाली असल्यास ती दुरुस्त करा. माहिती दुरुस्त केल्यानंतर तुमची अडकलेली रक्कम एक आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जाते.

असा करा मोबाईलवरून पीक विम्याला अर्ज

शेतकरी मित्रांनो सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही सेवा केंद्रात जाऊन पैसे खर्च करण्याची गरज नाही. Hello Krushi या मोबाईल अँपवरून तुम्ही स्वतः आता कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करू शकता. शिवाय रोजचा बाजारभाव, जमीनीचा सातबारा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज आदी सेवाही इथे मोफत मध्ये उपलब्ध आहेत. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इंस्टाल करून घ्या.

PM Kisan चे पैसे आले नसतील तर या गोष्टी आजच करून घ्या –

 • प्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्या.
 • आता अँपवर मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा.
 • त्यानंतर आता अँप ओपन केल्यानंतर तुम्हाला होम पेजवर सरकारी योजना या नावाची एक विंडो दिसेल. त्यावर क्लिक करा
 • सरकारी योजना मध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या योजनांची यादी दिसेल. इथून तुम्ही हव्या त्या सरकारी योजनेला अर्ज करू शकता.
 • आता या योजनांपैकी PM किसान योजना निवदा.
 • pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
 • उजव्या बाजूला माजी कोपरा लिहिलेला दिसेल. ह्या वर .
 • येथे लाभार्थी स्थितीवर.
 • येथे तुम्हाला आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल.
 • डेटा मिळविण्यासाठी आधार क्रमांक टाका.
 • प्रक्रिया फॉलो केल्यानंतर तुमची सर्व माहिती तुमच्यासमोर येईल.
 • तुमचा आधार क्रमांक आणि खाते क्रमांक चुकीचा असेल तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता

खात्यात 2000 रुपये न मिळाल्यास येथे संपर्क करा

लाभार्थी यादीत सामील झाल्यानंतरही, 13व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात पोहोचले नसल्यास, तुम्ही [email protected] या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता. तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

error: Content is protected !!