Pm Kisan Yojna Update : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून अनेक योजना राबवत असते. शेतकरी देखील सरकारच्या या अनेक योजनांचा लाभ घेतात. दरम्यान सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना गोरगरीब शेतकऱ्यांसाठी सुरू केली असून या योजनेचे 14 हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. त्याचबरोबर आता 15 व्या हप्त्यासाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली असे झाली आहे. 15 व्या हप्त्याबाबत असे म्हटले जात आहे की नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते. (Pm Kisan Yojna Update)
रजिस्टर करताना चुका करू नका
जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्ही लिहिलेल्या अर्जात कोणतीही चुका करू नका असे केल्यास तुम्हाला या लाभापासून वंचित राहावे लागेल. यावेळी शेतकऱ्यांचे लिंग, नाव, आधार क्रमांक, पत्ता या सर्व गोष्टी जर चुकीच्या टाकल्या तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही त्याचबरोबर बँक खाते क्रमांक चुकीचा लिहिला तरी तुम्हाला हप्त्यापासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे पीएम किसान योजनेसाठी रजिस्टर करताना शेतकऱ्यांनी सावधान राहायला हवे.
शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पुढील हप्ता पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. जर तुम्ही अजूनही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर लगेचच पीएम किसान पोर्टलवर जाऊन तुम्ही केवायसी करू शकता. जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला १५ व्या हप्त्यापासून वंचित रहावे लागेल त्याचबरोबर तुम्हाला पीएम किसान योजनेस संबंधी कोणतीही समस्या असेल तर किसान ईमेल आयडी [email protected] वर संपर्क करु शकता. त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा हेल्पलाईन क्रमांक – 155261 किंवा 1800115526 ( Toll Free ) किंवा 011-23381092 वर कॉन्टेक्ट करु शकता.
या ठिकाणी मिळतील पीएम किसान योजनेचे सर्व अपडेट
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीएम किसान योजनेचे कोणतेही अपडेट पाहायचे असतील तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही पीएम किसान योजने संबंधित सर्व अपडेट तुमच्या मोबाईलवर पाहू शकता. तेही अगदी मोफत. त्याचबरोबर अन्य सरकारी योजनांची देखील माहिती तुम्ही अचूक पद्धतीने या ॲपच्या माध्यमातून पाहू शकता. त्यामुळे लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.