PM Kusum Yojana 2023 : पडीक जमिनीतही घेता येईल लाखोंचे उत्पन्न; सरकारची ‘हि’ योजना तुम्हाला माहितीय का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । आपली जमीन जर सुपीक असेल तर चांगले उत्पन्न घेता येते. (PM Kusum Yojana 2023) मात्र आता तुमची जमीन पडीक असली तरीसुद्धा तुम्ही त्यातून लाखोंचे उत्पन्न घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका खास योजनेबाबत माहिती देणार आहोत. पंतप्रधान कुसुम योजना असे या योजनेचे नाव असून सरकार यासाठी मोठे अनुदान देत आहे.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर उर्जेवर चालणारे सौर पंप उपलब्ध करून देण्याच्या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल सिंचन पंपांचे सौर ऊर्जा पंपांमध्ये रूपांतर करणार आहे. देशातील शेतकरी जे डिझेल किंवा पेट्रोलच्या सहाय्याने कृषीपंप चालवतात, ते पंप आता या PM Kusum Yojana 2023 अंतर्गत सौरऊर्जेने चालवले जातील.

पंतप्रधान कुसुम योजनेला अर्ज कसा करावा?

शेतकरी मित्रांनो आता कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करणे अतिशय सोपे झाले आहे. यासाठी आता तुम्हाला कुठेही नेटकेफेत जाण्याची गरज नाही. घरी बसून शासकीय योजनांना अर्ज करण्यासाठी आजच तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या. Hello Krushi अँपच्या मदतीने तुम्ही शासकीय योजनेला तुमच्या मोबाइलवरूनच अर्ज करू शकता. तेव्हा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी उशीर न करता आजच आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करून योजनेचे लाभार्थी बाणा.

 1. गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करून हिरव्या रंगाचा लोगो असणारे Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करून घ्या.
 2. आता मोबाईल नंबर, नाव, गाव आदी माहिती भरून Hello Krushi अँपला मोफत रजिस्टर करा.
 3. यानंतर आता Hello Krushi ओपन करून होम पेजवरील सरकारी योजना या विभागात जा.
 4. इथे तुम्हाला सर्व सरकारी योजनांची यादी दिसेल. यामध्ये तुम्हाला ज्या योजनेला अर्ज करायचा आहे ती योजना निवडा.
 5. आता तुम्हाला सदर योजनेची सर्व माहिती दिसेल. यामध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर सर्वात शेवटी Apply Now या बटनावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.

सरकार किती अनुदान देतं?

पीएम कुसुम योजनेअंतर्गंत (PM Kusum Yojana 2023) सरकारकडून जवळपास 60 टक्के अनुदान दिले जाते. तर 30 टक्के लोन बँककडून मिळते. तर दहा टक्के शेतकर्यांना लावावे लागतात. त्यानंतर मोफत विजेचा लाभ घेता येऊ शकतो. कुसुम योजनेचा शेतकर्यांना मोठा फायदा होतो, कारण शेतकऱ्यांना विजेचासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. याचाच फायदा शेतीमध्ये दिसून येतो.

कमाई कशी होणार?

जर एखाद्या शेतकऱ्यांकडे पाच ते सहा एकर जमीन असेल तर तो सोलार प्लांट करत कमीत कमी 15 ते 20 लाख युनिट (Electricity Unit) वीज निर्मिती करु शकतो. ही वीज तीन रुपये प्रति युनिटने विकली तरी जवळपास 60 लाख रुपयांची कमाई होऊ शकते. पण इतके मोठं सोलार प्लांट सुरु करण्यासाठी जवळपास 20 लाख रुपयांचा खर्च होतो. पण या योजनेमार्फत तुम्ही वर्षाला 40 लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकता. त्याशिवाय शेतात तुमचा कायमस्वरुपी विजेचा प्रश्न सुटू शकतो.

अर्ज कसा कराल?

पीएम कुसुम योजनेसाठी (PM Kusum Yojana 2022) अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://mnre.gov.in/ या सरकारी संकेतस्थाळावर जावे लागेल. यामध्ये प्रॉपर्टी, आधार कार्ड आणि बँक डिटेल्सची माहिती भरावी लागेल. महत्वाचं म्हणजे, तुमची जमीन वीज उपकेंद्रांच्या पाच किलोमीटरच्या आतमध्ये हवी. तेव्हाच तुम्हाला पीएम कुसुम योजनेचा लाभ घेता येईल.

PM Kusum Yojana 2023 महाराष्ट्र सौर कृषी पंप लाभार्थी निवडीचे पात्रता निकष कोणते?

 • अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार
 • बोरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी अर्जासाठी पात्र असतील.
 • ज्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील.
 • २.५ एकर शेतजमीन असणारे शेतकरी ३ HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५ HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 चे वैशिष्ट्य काय?

 • पारेषण विरहित ३८१४ कृषी पंपाची महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यात स्थापना करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे.
 • शेतकऱ्यांना स्वखर्चाने इतर उपकरणे या कृषी पंपाला लावता येतील.
 • सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांचे कृषिपंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा घोषित केलेला आहे.
 • शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी व त्यापेक्षा जास्त अश्‍वशक्ती एचपी डीसी सौर पंप अर्ज केल्यानंतर उपलब्ध होणार आहेत.

पंतप्रधान कुसुम योजना महाराष्ट्र 2023 लाभ –

 • शेतकर्‍यांना अखंडित वीजपुरवठा पुरवतो.
 • शेतकर्‍यांच्या शेती उर्जा अनुदानाचा भार कमी करते.
 • भूजल अतिरेक तपासणीची क्षमता
 • शेतकर्‍यांना जोखीम-मुक्त उत्पन्न प्रदान करते.
 • शेतीत कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास मदत करते.

कुसुम योजनेच्या अर्जासाठी आवश्यक पात्रता –

 • अर्जदार हा भारताचा कायम रहिवासी असावा.
 • सदर योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही.
 • अर्जदार त्याच्या जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमता (जे कमी असेल) च्या प्रमाणात २ मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो.
 • सदर योजनेअंतर्गत शेतकरी ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.
 • जर प्रकल्प विकसकामार्फत अर्जदाराद्वारे विकसित केला जात असेल, तर विकसकाची निव्वळ मालमत्ता प्रति मेगावॅट १ कोटी रुपये आहे.
 • प्रति मेगावॅट अंदाजे २ हेक्टर जमीन आवश्यक आहे.

कुसुम योजनेचे लाभार्थी –

 • शेतकरी
 • सहकारी संस्था
 • शेतकर्‍यांचा गट
 • जल ग्राहक संघटना
 • शेतकरी उत्पादक संस्था

कुसुम योजना महाराष्ट्र 2023 महत्वाची कागदपत्रे –

 • आधार कार्ड
 • पासपोर्ट साईझ फोटो
 • रेशन कार्ड
 • नोंदणी प्रत
 • प्राधिकरण पत्र
 • जमीन प्रत
 • चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र (विकासकाद्वारे प्रकल्प विकसित करण्याच्या बाबतीत)
 • मोबाइल नंबर
 • बँक खाते विवरण

कुसुम योजना अर्ज फी –

PM Kusum Yojana 2023 योजनेंतर्गत अर्जदारास सौर उर्जा केंद्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रति मेगावॅट ₹ ५००० आणि जीएसटीचा अर्ज भरावा लागेल. राजस्थान नूतनीकरणयोग्य ऊर्जा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या नावे डिमांड ड्राफ्टच्या रूपात ही देय रक्कम दिली जाईल. ०.५ मेगावॅट ते २ मेगावॅट पर्यंतच्या अर्जांचे अदा करावयाची शुल्क खालीलप्रमाणे असणार आहे. हि शुल्क म्हणजेच अर्जाची फी मेगावॅट नुसार आकारली जाणार आहे, ती खालील प्रमाणे असेल.

 • ०.५ मेगावॅट साठी रु. २,५०० + जीएसटी
 • १ मेगावॅट रु. ५,००० + जीएसटी
 • १.५ मेगावॅट रु. ७,५०० + जीएसटी
 • २ मेगावॅट रु. १०,००० + जीएसटी
error: Content is protected !!