हॅलो कृषी ऑनलाईन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत (Agriculture And Animal Husbandry Schemes In Maharashtra) आज वाशिम येथे 23,300 कोटी किमतीच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ झालेला आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या (PM Kisan Yojana) 18 व्या हप्त्याचा वितरण सोहळ्यासाठी पंतप्रधान आज वाशिम येथे उपस्थित होते.
आज शुभारंभ केलेल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये (Agriculture And Animal Husbandry Schemes In Maharashtra) 9.5 कोटी शेतकऱ्यांसाठी 18 वा PM-KISAN हप्ता, 5वा नमो शेतकरी हप्ता, 7,500 कृषी प्रकल्प, 9,200 FPO, पाच सोलर पार्क आणि प्रगत पशु तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.
वाशिम येथे सुमारे ₹ 23,300 कोटी किमतीच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी (Agriculture And Animal Husbandry Schemes In Maharashtra) संबंधित विविध उपक्रमांचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज सांगितले की, सरकारचे प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक धोरण विकसित भारतासाठी कटिबद्ध आहे आणि शेतकरी हा या व्हिजनचा प्रमुख पाया आहे.
पंतप्रधानांनी सुरू केलेल्या विविध उपक्रमांमध्ये (Agriculture And Animal Husbandry Schemes In Maharashtra) PM-KISAN सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरित करणे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता लॉन्च करणे, कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF), 9,200 शेतकरी उत्पादक संघटना अंतर्गत 7,500 हून अधिक प्रकल्प यांचा समावेश आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 19 मेगावॅट क्षमतेचे पाच सोलर पार्क आणि पशुंसाठी युनिफाइड जीनोमिक चिप (Unified Genomic Chip For Cattle) आणि स्वदेशी पशु लिंग-क्रमित वीर्य तंत्रज्ञानाचा शुभारंभ सुद्धा करण्यात आलेला आहे.
मेळाव्याला संबोधित करताना, पंतप्रधान, सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना PM-KISAN सन्मान निधीच्या 18 व्या हप्त्याचे सुमारे 20,000 कोटी रुपयांचे वितरण करताना म्हणाले की, राज्य सरकार आपल्या शेतकऱ्यांना दुहेरी लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मोदींनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा उल्लेख करताना म्हटले आहे की महाराष्ट्रातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना अंदाजे 1,900 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
शेकडो कोटी रुपयांचे शेतकरी उत्पादक संस्थांशी संबंधित अनेक प्रकल्प (Agriculture And Animal Husbandry Schemes In Maharashtra) समर्पित करण्याचा त्यांनी उल्लेख केला. लाडकी बहिण योजनेचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले आहे की ही योजना नारीशक्तीच्या क्षमतांना बळ देत आहे.
भारताच्या विकास आणि प्रगतीच्या विरोधात येणाऱ्या धोक्यांची लोकांना आठवण करून देताना मोदी म्हणाले, “लोकांमध्ये एकजूटच देशाला अशा आव्हानांपासून वाचवू शकते.”
सिंचन प्रकल्प
भारतातील शेतकऱ्यांना बळकट करण्यासाठी सुरु केलेल्या महत्त्वाच्या योजनांवर चर्चा करताना कृषी उत्पादनांची साठवण, प्रक्रिया आणि व्यवस्थापन क्षमता वाढवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अनेक प्रमुख कृषी पायाभूत प्रकल्पांचा (Agriculture And Animal Husbandry Schemes In Maharashtra) पंतप्रधानांनी उल्लेख केला. हे प्रकल्प शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने होते असेही ते म्हणाले.
मागील सरकारने सिंचन प्रकल्पांना झालेल्या दिरंगाईची आठवण करून देत मोदी म्हणाले की, सध्याचे सरकार आल्यानंतरच जलद गतीने काम सुरू झाले. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, नागपूर आणि वर्धा येथील पाणीटंचाईचे प्रश्न सोडवण्यासाठी सुमारे ₹90,000 कोटी खर्चून वैनगंगा-नळगंगा नद्या जोडण्याच्या प्रकल्पाच्या मंजुरीकडे त्यांनी लक्ष वेधले. कापूस आणि सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना 10,000 रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून त्यांनी केली. अमरावती येथे टेक्सटाईल पार्कचीही नुकतीच पायाभरणी करण्यात आली असून त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.