PM Swanidhi योजनेला डिसेंबर 2024 पर्यंत मुदत वाढ, जाणून घ्या फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पीएम स्वानिधी योजनेला डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना कॅबिनेट मंत्र्यांनी सांगितले की, पीएम स्ट्रीट व्हेंडर्स सेल्फ रिलेंट फंड आता 8100 कोटी करण्यात आला आहे. याचा फायदा शहरी भारतातील 1.2 कोटी लोकांना होणार आहे.

समाजातील विविध घटकांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत असते. या अंतर्गत जनतेला सर्व प्रकारच्या सुविधा आणि आर्थिक मदत दिली जात आहे. यापैकी एक योजना म्हणजे PM स्वानिधी योजना. याअंतर्गत पथारी व्यावसायिक, हातगाड्या आदी उभ्या करणाऱ्या पथारी व्यावसायिकांना 10 हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. प्रधानमंत्री स्वानिधी योजना ही अशीच एक योजना आहे, ज्या अंतर्गत कोरोनाच्या काळात प्रभावित झालेल्या किंवा रोजगार गमावलेल्या लोकांना मदत केली जाते. कोरोनाचा सर्वाधिक फटका रोजंदारी कामगारांना बसला. काही लोक रस्त्यावर माल विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत अशा लोकांना पुन्हा रोजगार सुरू करण्यासाठी मदत केली जाते.

काय आहे पीएम स्वानिधी योजना?

–या योजनेअंतर्गत कर्जदाराचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.
–शहरी असो की निमशहरी किंवा ग्रामीण असो, रस्त्यावरील विक्रेते हे कर्ज घेऊ शकतात.
–सरकारच्या या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना एका वर्षासाठी दहा हजार रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज मिळू शकते.
–म्हणजेच या योजनेत तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची हमी द्यावी लागणार नाही.
–सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही कर्जाची रक्कम मासिक हप्त्यांमध्ये भरू शकता.
–पीएम स्वानिधी योजनेवर सबसिडी देखील उपलब्ध आहे.कर्जदारांना हे कर्ज एका वर्षात हप्त्याने परत करावे लागेल.
–जे कर्जाची वेळेवर परतफेड करतील, त्यांच्या खात्यावर वार्षिक ७ टक्के व्याज अनुदान जमा केले जाईल.

Leave a Comment

error: Content is protected !!