Poly House : हवामान नियंत्रण कृषी योजनेंतर्गत डोंगराळ भागात पॉलीहाऊस बांधण्यात येणार, जाणून घ्या काय होणार फायदा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Poly House : देशभरातील बदलत्या हवामानामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, भटक्या गुरांमुळे देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. हवामानामुळे डोंगराळ भागातील पिके नष्ट होत आहेत, मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हिमाचल प्रदेशच्या IIT मंडीने शेतकऱ्यांच्या या समस्येवर उपाय शोधला आहे.

माहितीनुसार, IIT ने नुकतीच ‘Climate Control Agriculture Scheme’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अर्धा बिघा जमिनीवर पॉलीहाऊस बांधले जाणार आहे. ज्यामध्ये पिकांनुसार सर्व व्यवस्था केली जाईल. योग्य तापमान, हवा, पाणी असेल. अशी सुविधा मिळाल्याने शेतकरी स्वतःच्या आवडीची शेती करून लाखो रुपये कमवू शकतील.

शेतकऱ्यांना करणार जागरूक

या योजनेवर आयआयटी मंडी आणि पालमपूर कृषी विद्यापीठ दोन्ही एकत्रितपणे काम करत आहेत. याअंतर्गत कृषी तज्ज्ञ शेतकऱ्यांना पिके कशी घ्यायची याबाबत जागरुक करतील आणि कमी जागेत अधिक पिके कशी घेता येतील याची संबंधित व्यवस्था देखील केली जाईल. जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. याशिवाय विकसित झालेल्या नवीन प्रजातींची माहिती देखील शेतकऱ्यांना दिली जाईल.

हवामान नियंत्रण कृषी योजना

हवामान नियंत्रण कृषी योजनेंतर्गत, हिमाचल प्रदेशमध्ये IIT द्वारे 30 पॉलीहाऊस बांधण्यात येणार आहेत. दुसरीकडे, आयआयटी मंडईच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, पावसाळ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या काळात पिके वाया जाण्यापासून वाचवता येणार असून ही योजना शेतकऱ्यांसाठी चांगली ठरणार आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मिळेल सरकारी योजनांची माहिती

तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे अनेकांना घरबसल्या सर्व गोष्टींची माहिती जाणून घ्यायची असते. याचाच विचार करून आम्ही शेतकऱ्यांसाठी एक खास ॲप बनवले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी घरबसल्या शेतीविषयक सर्व माहिती मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही सर्व सरकारी योजनांची माहिती घेऊ शकता त्याचबरोबर हवामान अंदाज, बाजार भाव, पशुंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा यासंबंधी सर्व माहिती घेऊ शकता.

error: Content is protected !!