Pomegranate Market : डाळिंबाच्या उत्पादनात मोठी घट, तरी दर कमीच; डाळिंब उत्पादक शेतकरी नाराज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Pomegranate Market : सध्या बरेच शेतकरी फळ शेतीची लागवड करताना दिसत आहेत. यामध्ये शेतकरी द्राक्ष, आंबा, डाळिंब यासारखे पिकाचे उत्पन्न घेतात आणि त्यामधून चांगले पैसे कमवत आहेत. मात्र सध्या वातावरणातील बदलामुळे डाळिंब पिकाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे डाळिंबाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आह. तरी दरात मंदी कायमच असल्याचे दिसत आहे, त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी नाराज आहेत,

अलीकडेच बांगलादेशने डाळिंबाच्या आयातीवर सुमारे 110 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे डाळिंबाचे उत्पादन घटले असताना देखील दरामध्ये मोठी मंदी पाहायला मिळत आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे अशी बाब अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे आता कृषिमंत्री धनंजय मुंडे याबाबत काय निर्णय घेणार याकडे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

डाळिंबाला किती बाजार भाव मिळतो?

तुम्हाला जर डाळिंबाचे रोजचे बाजार भाव जाणून घ्यायचे असतील तर गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही डाळिंबाचे दररोजचे बाजार भाव पाहू शकता. त्याचबरोबर इतर शेतमालाचे देखील बाजार भाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही या ॲपच्या माध्यमातून सरकारी योजना, हवामान अंदाज, पशूंची खरेदी-विक्री, जमीन मोजणी, शेतकऱ्यांच्या जुगाडांची माहिती व त्यांची खरेदी विक्री, इत्यादी गोष्टींची माहिती अगदी मोफत मिळू शकतात त्यामुळे लगेचच हे ॲप इन्स्टॉल करा.

महाराष्ट्रामध्ये डाळिंबाची लागवड क्षेत्र जवळपास दीड लाख हेक्टर आहे. यामध्ये एकूण डाळिंब उत्पादनापैकी 60 टक्के डाळिंब बांगलादेशाला निर्यात होते मात्र गतवर्षी राज्यातून 90 हजार टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. मात्र त्यापैकी फक्त अठरा हजार टन निर्यातीची नोंद राज्याच्या नावावर झाली.

शेतकरी चिंतेत

सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना पिकांना तांब्याने पाणी देण्याची वेळ आली आहेत. फळबाग जगवण्यासाठी शेतकरी टॅंकरने पाणी विकत घेऊन फळबागेला देत आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे पिकाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.

error: Content is protected !!