Pomegranate Sucking Pest Control: डाळिंब बागेत फुलधारणा आणि फळधारणा अवस्थेत ‘असे’ करा रसशोषक किडींचे नियंत्रण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या डाळिंब बागेत (Pomegranate Sucking Pest Control) मृगबहार (Mrug Bahar) अवस्थेतील फुलधारणा (Flowering Stage) आणि फळधारणा अवस्था (Fruit Setting Stage) सुरु आहे. अशावेळी पिकावर फुलकिडी (Thrips), मावा (Aphids), पांढरी माशी (White Fly) यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. या रसशोषक किडींचे नियंत्रण उपाय जाणून घेऊ या.

डाळिंब बागेत रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण उपाय (Pomegranate Sucking Pest Control)

  • बागेत स्वच्छता राखावी, तणांचे वेळीच नियंत्रण करावे.
  • झाडाच्या शेंड्याच्या 15 सेंटिमीटर खाली नागमोडी पद्धतीने पिवळे/निळे चिकट सापळे (Sticky Traps) @ 25-30 सापळे प्रति एकर याप्रमाणात लावावेत.
  • रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी स्पिनेटोरम 12% SC @ 1.0 मिली/लिटर किंवा स्पिनोसॅड 45% SC @ 0.5 मिली/लिटर पाणी  + 0.25 मिली/लिटर स्प्रेडर स्टिकर याप्रमाणात फवारणी करावी.
  • रसशोषक किडींसाठी दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 7-10 दिवसांनी, स्पिनोसॅड 45% SC @ 0.5 मिली/लिटरची दुसरी फवारणी किंवा निंबोळी तेल 1% (10000 पीपीएम) @ 3.0 मिली/लिटर किंवा पोंगामिया तेल (करंज तेल) @ 3 मिली/लिटर किंवा नीमतेल + पोंगामिया तेल प्रत्येकी 3 मिली/लिटर + 0.3 मिली/लिटर स्प्रेडर स्टिकरच्या मिसळून फवारणी करावी.  
  • तिसरी फवारणी स्पिनेटोरम 12% SC @ 1.0 मिली/लिटर किंवा स्पिनोसॅड 45% SC @ 0.5 मिली/लिटर  + 0.25 मिली /लिटर स्प्रेडर स्टिकर मिसळून फवारणी करावी.
  • सायंकाळच्या वेळी बागेत धूर करावा.
  • रस शोषक किडीवर (Pomegranate Sucking Pest Control) उपजीविका करणाऱ्या परोपजीवी किडींचे (क्रायसोपर्ला, ढालकीडा, क्रिप्टोलेमस, सिरफिड माशी इ.) संवर्धन करावे.
error: Content is protected !!