मुंबई । कोरोनंतरच्या काळात अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अलीकडच्या कालावधीत पोल्ट्रीच्या संख्येत वाढ झाली असली तरी अंड्यांची टंचाई भासत आहे. बॉयलरचे अंडे ६.२८ रुपये तर देशी अंडे १० रुपायांनीं विक्री होत आहे. महाराष्ट्रातील अंड्याची टंचाई दूर करण्यासाठी सरकार सबसिडी देणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतचा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाने राज्य सरकारला पाठवला असून यावर मंजुरी आली तर सबसिडी देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात कमी उत्पादनामुळे अंड्यांचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे. आकडेवारीनुसार राज्यात एक कोटी अंड्यांचा तुटवडा जाणवत आहे. राज्यात त्याचे उत्पादन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आराखडा तयार केला आहे. पशुसंवर्धन विभाग प्रत्येक जिल्ह्याला 21,000 रुपयांच्या सवलतीच्या दरात 50 पांढऱ्या लेगहॉर्न कोंबड्या आणि 1,000 पिंजरे देण्याचे नियोजन करत आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. Poultry Business
अशी करा शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री
शेतकरी मित्रांनो Hello Krushi या गुगल प्ले स्टोअरवरील अँपच्या मदतीने तुम्ही आता शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्री करू शकता. यामध्ये शेतमाल, फळे, भाजीपाला पासून ते अगदी दूध, अंडी या गोष्टी शेतकरी थेट आपल्या जवळच्या ग्राहक अँपवरीन विकू शकतो. शेतकरी बऱ्याचदा आपला शेतमाल व्यापाऱ्याला विकतो. यामध्ये व्यापारी मोठा नफा कमावतो आणि शेतकऱ्याच्या पदरी तोटाच येतो. शेतकऱ्याला स्वतः माल विक्री करण्यासाठी ना दुकान असते ना त्याच्याकडे यासाठी वेळ असतो. मात्र आता Hello Krushi अप्प्ने शेतकरी ते ग्राहक खरेदी विक्रीची पद्धत अतिशय सोपी केली आहे. ५० हजरहून अधिक शेतकरी याद्वारे नफा कमावत आहेत. Hello Krushi अँप मोबाईलवर डाउनलोड करून लाभार्थी बना.
सध्या कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू येथून अंडी खरेदी केली जातात
महाराष्ट्रात दररोज २.२५ कोटींहून अधिक अंडी वापरली जातात. पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे म्हणाले की, राज्यात दररोज एक ते १.२५ कोटी अंडी उत्पादन करण्याची क्षमता आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी विभाग नियोजन करत आहे. टंचाईवर मात करण्यासाठी सध्या कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू येथून अंडी खरेदी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अंड्याच्या किमतीत वाढ
औरंगाबादमध्ये गेल्या दोन महिन्यांत अंड्यांचे भाव वाढले आहेत. औरंगाबादमध्ये 100 अंड्यांची किंमत 575 रुपये आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ किंमती 500 रुपयांच्या (100 अंडी) वर आहेत. काही काळापासून अनेक राज्यांमध्ये अंडी उत्पादनावर खूप लक्ष दिले जात आहे. शेतकरी आणि पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार विविध योजनांवर काम करत आहे.