Poultry Farming : कौतुकास्पद! युद्धजन्य परिस्थितीतही इस्राईलमध्ये विक्रमी अंडी उत्पादन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय करतात. राज्य सरकारकडूनही पोल्ट्री उद्योग (Poultry Farming) उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान व बँक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. राज्यातील शेतकरी त्यातून चांगला नफा मिळवतात. मात्र आता पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming) क्षेत्रातील अशीच एक कौतूकास्पद बातमी समोर आली आहे.

सध्यस्थितीत इस्राईल-हमास यांच्यामध्ये गाझा पट्टीवरून भीषण युद्ध सुरु आहे. मात्र असे असतानाही ‘ऑक्टोबर २०२३’ या महिन्यात इस्राईलमध्ये विक्रमी २२० दशलक्ष अंड्याचे उत्पादन झाले आहे. युद्धामुळे इस्राईलमधील शेती व्यवसायात मोठा व्यत्यय येत आहे. मनुष्यबळाअभावी पिक काढणी थांबली आहे. परिणामी तेथील भाजीपाला शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना बाजारात भाजीपाला मिळणे मुश्किल झाले आहे. त्या ठिकाणी इस्रायली सरकारकडून बाहेरील देशांकडून आयात केलेला भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा जनतेला केला जात आहे.

वार्षिक १.६ अब्ज अंडी उत्पादन (Poultry Farming In Israel)

सर्वसाधारपणे इस्राईलमध्ये दरवर्षी १.६ अब्ज अंड्यांचे उत्पादन होते. अर्थात आठवड्यात इस्राईलमध्ये ४० दशलक्ष अंडी तर महिन्याला १६० दशलक्षच्या आसपास अंडी उत्पादित होतात. मात्र गत ऑक्टोबर महिन्यात इस्राईलने पोल्ट्री उत्पादनात विक्रमी झेप घेतली असून, २२० दशलक्ष अंड्यांचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे आता इस्रायली बाजारात भाजीपाल्याची असलेली कमतरता अंडीद्वारे भरून निघणार आहे.

दूध पुरवठा सुरळीत

अंडी उत्पादन वाढीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील मांस विक्रीसाठीचे अनेक कत्तलखाने मनुष्यबळाअभावी बंद असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असले तरी सध्यस्थितीत देशात ताज्या मांसाची कोणतीही कमतरता जाणवत नसल्याचे इस्रायली कृषी मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे. तसेच युद्धाच्या केंद्रस्थानी असलेल्या गाझा परिसरातून सामान्य परिस्थितीच्या तुलनेत सध्या केवळ ६० टक्के दूध संकलन होत आहे. मात्र असे असूनही देशात दुधाचाही पुरवठा सुरळीत सुरु असल्याचे इस्रायली कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

error: Content is protected !!