हॅलो कृषी ऑनलाईन: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (Pradhanmantri Pik Vima Yojana) शेतकर्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने 2023 (PM Pik Vima 2023 Maharashtra) मध्ये घेतला आहे. गत वर्षी खरीप 2023 मध्ये राज्यातील विक्रमी असे 1 कोटी 70 लाख विमा अर्ज द्वारे शेतकर्यांनी (Farmers) याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या होणार्या नुकसानीपासून (Crop Damage Due To Natural Calamity) शेतकऱ्यांस आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना (Pradhanmantri Pik Vima Yojana) राबवण्यात येत आहे . खरीप 2024 हंगामात (Kharif Season) पेरण्या सुरू झाल्या आहेत. शेतकर्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाचे (Central Government) पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in सुरू करण्यात आले आहे. शेतकर्यांनी एक रुपया भरून आपल्या पिकाचा विमा घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
योजनेची वैशिष्ट्ये आणि नियम (Pradhanmantri Pik Vima Yojana)
- विमा योजनेत (Crop Insurance) भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे, कापूस व कांदा इत्यादी 14 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. अधिसूचित क्षेत्रातील शेतकर्यांना यात भाग घेता येईल.
- अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकर्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
- पीक कर्ज घेणार्या आणि बिगर कर्जदार शेतकर्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील.
- भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकर्यांना पीक विमा पोर्टल वर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे .
- ई-पीक पाहणी: शेतकर्याने लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी (E-Crop Inspection) मध्ये करावी.
- आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे, उदाहरणार्थ शासकिय जमीन, अकृषक जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मस्जिद यांची जमीन वर विमा काढल्यास त्याची अत्यंत गंभीर दाखल घेतली जाईल.
- या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल.
- या वर्षी भात, कापूस, सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडल मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रीमोट सेसिंग तंत्रज्ञानचा वापर करून येणार्या उत्पादनास 40% भारांकन आणि पीक कापणी प्रयोग द्वारे आलेल्या उत्पादनास 60% भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.
- अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे.
- पीक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावाप्रमाणेच असावा.
- पीक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टल द्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपला बँक मॅनेजर माहिती देऊ शकतो.
- आधार कार्ड वरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे.
- विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये 40 मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकर्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे.
विमा संरक्षणाच्या बाबी पुढील प्रमाणे
- पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट.
- पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान.
- हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान.
- काढणी पश्चात् पिकाचे नुकसान.
- स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान.
पीक विमा योजनेत (Pradhanmantri Pik Vima Yojana) सहभागी होण्याकरिता शेतकर्याने काय करावे?
- अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकर्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान 7 दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे.
- इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला 7/12 चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.
- योजनेत (Pradhanmantri Pik Vima Yojana) सहभागासाठी अंतिम मुदत दि. 15 जुलै 2024 आहे.
सर्वसाधारण पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम, यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.
अ.क्र | पिक | विमा संरक्षित रक्कम रु./हे |
1 | भात | 40,000 ते 51,760 |
2 | ज्वारी | 20,000 ते 32,500 |
3 | बाजरी | 18,000 ते 33,913 |
4 | नाचणी | 13,750 ते 20,000 |
5 | मका | 6,000 ते 35,598 |
6 | तूर | 25,000 ते 36,802 |
7 | मुग | 20,000 ते 25,817 |
8 | उडीद | 20,000 ते 26,025 |
9 | भुईमुग | 29,000 ते 42,971 |
10 | सोयाबीन | 31,250 ते 57,267 |
11 | तीळ | 22,000 ते 25,000 |
12 | कारळे | 13,750 |
13 | कापूस | 23,000 ते 59,983 |
14 | कांदा | 46,000 ते 81,422 |
अधिक माहितीसाठी संपर्क (Pradhanmantri Pik Vima Yojana)
योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14447 संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.