Processing and Storage Center: जेएनपीए’च्या बंदरात कृषी माल प्रक्रिया आणि साठवण यंत्रणा सुरु होणार; जाणून घ्या फायदे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: उरणनजीकच्या (Processing and Storage Center) शेवा बंदराच्या (Jawaharlal Nehru Port) परिसरातील 27 एकर जमिनीवर कृषी मालावर एकात्मिक पद्धतीने प्रक्रिया करून साठवणुकीची व्यवस्था पुरवणारे केंद्र (Processing and Storage Center) उभारण्याचा निर्णय जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (JNPA) घेतला आहे.

मोठ्या प्रमाणात दर्जेदार उत्पादन घेऊनही साठवणूक तसेच प्रक्रिया केंद्राची सुविधा नसल्यामुळे कृषी मालाची परदेशात विक्री न करू शकणाऱ्या शेतकऱ्यांना (Relief For Farmers) यामुळे दिलासा मिळणार आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प (Processing and Storage Center) असणार आहे.

कृषी उत्पादनात भारत जागतिक पातळीवर दुसऱ्या स्थानी असला तरी उत्पादित होणाऱ्या कृषी मालापैकी जेमतेम अडीच टक्के मालाचीच निर्यात (Agriculture Export) भारतातून होते. कृषी मालाच्या निर्यातीत जागतिक क्रमवारीत भारत आठव्या क्रमांकावर आहे. यामागे सर्वात मोठे कारण कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या आणि साठवणूक करणाऱ्या केंद्रांची (Processing and Storage Center) कमतरता हे आहे. या पार्श्वभूमीवर जेएनपीएतर्फे उभारण्यात येणारा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतील शेतकऱ्यांनादेखील या प्रकल्पाचा लाभ होणार आहे.

देशातील कृषी उत्पादन (Agriculture Production) व निर्यातीचा तीन वर्षे सखोल अभ्यास करून अद्यायावत सोयीसुविधांनी सज्ज असलेला हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर चालवण्यात येणार आहे. यासाठी 285 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून शीतगृह (Cold Storage), प्रक्रियागृह (Processing House) उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी साठवण केंद्रासह प्राथमिक प्रक्रिया केंद्र, निर्यात मालाचे धुरीकरण, उत्पादनाचे एकत्रीकरण, दर्जानुसार निवड, पॅकिंग आदी सुविधा असणार (Processing and Storage Center) आहेत. या प्रकल्पाची उभारणी एप्रिल 2025 मध्ये सुरू होऊन सव्वा ते दीड वर्षाच्या कालावधीत प्रकल्प सुरू होण्याचे अपेक्षित आहे.

साठवणूक केंद्राची वैशिष्ट्ये (Processing and Storage Center)

● आंबा, द्राक्षे, डाळिंब, केळी, कांदा आदी कृषी मालांच्या साठवणुकीची व्यवस्था

● मांस तसेच मत्स्य उत्पादनांच्या साठवणुकीचीही सोय.

● तांदूळ, मका, गहू, कडधान्ये साठवण्याचीही व्यवस्था

● प्रति वर्ष १.२ दशलक्ष टन कृषी मालाची हाताळणी अपेक्षित

● अत्याधुनिक नियंत्रण प्रणाली व साहित्य उपकरणांचा वापर

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाच्या बंदराच्या माध्यमातून औद्याोगिकीकरण करण्याच्या भूमिकेनुसार कृषीआधारित आयात-निर्यात मालावर प्रक्रिया व साठवणूक सुविधा विकसित करण्यात येत आहेत. कृषी मालाची नासाडी कमी करून त्याचा कालावधी वाढवणे, हा या प्रकल्पाचा प्राथमिक उद्देश आहे.

error: Content is protected !!