गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून विविध प्रकारच्या रंगांची निर्मिती ; तापमान नियंत्रित करण्यापासून अनेक फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आपलं घर आकर्षक करण्यासाठी घराला देण्यात येणारे विविध रंग हे लोकांना नेहमीच आकर्षित करतात, मात्र कराडच्या एमआयडीसीत चक्क देशी गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून रंग निर्मिती करण्यात येत असून हे रंग घरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यापासून ते घराचे तापमान नियंत्रित करणे व घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे यासारख्या विविध बाबींसाठी उपयुक्त ठरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या रंगांना भारतभर चांगली मागणी आहे. कराडच्या एमआयडीसीत सतीश बडे यांचा रंग सागर पेंट्स हा गाईच्या गोमूत्र पासून व शेणा पासून रंग तयार करण्याचा कारखाना आहे.

यामध्ये डिस्टेंपर, इमल्शन, प्रायमर सुरक्षाकवच अशा प्रकारचे नैसर्गिक रंग बनवले जातात. बाजारातील रासायनिक व महागड्या रंगांच्या तुलनेत हे नैसर्गिक रंग व पूर्ण सुरक्षित तसेच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. या उपक्रमाला वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे या उपक्रमाची सुरुवात कराड मधूनच झाली असून लवकरच याचे विस्तारीकरण करण्याचा मानस रंग सागर चे संचालक सतीश बडे यांनी बोलून दाखवला.

सध्या या कारखान्याच्या माध्यमातून महिन्याकाठी सुमारे दहा लाखांचा रंग तयार केला जात असून त्याची विक्रीही केली जात आहे. या रंगामुळे घरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते तसेच उपद्रवी कीटकांपासून संरक्षण मिळते पेस्ट कंट्रोलचा खर्च वाचतो आणि विशेष म्हणजे हे रंग तापमान नियंत्रित करतात लॅबरोटरी प्रमाणित असणाऱ्या या रंगांमध्ये गोमूत्र असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. विशेष म्हणजे या रंगासाठी परदेशातूनही विचारणा झाली आहे. मात्र तांत्रिक अडचणीमुळे हे काम थांबले असून लवकरच याबाबत ही पाऊल उचलले जाणार असल्याचे सतीश बडे यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!