दूधाळ जनावरांच्या वाहतूकीसाठी अनुदान द्या : खासदार श्रीनिवास पाटील यांची लोकसभेत मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परराज्यातून महाराष्ट्रात उत्तम प्रतीची दुधाळ जनावरे आणताना त्यांच्या वाहतूकीवर होणाऱ्या खर्चामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अशा जनावरांच्या वाहतूकीसाठी अनुदान देण्यात यावे अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.

याबाबत बोलताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले , पंजाब हरियाणा अशा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुधाळ जनावरणाची उपलब्धता आहे. महाराष्ट्रात अशी जनावरे आणायची झाल्यास सामान्य शेतकरी आणि कास्तकाराला मोठा खर्च उचलावा लागतो . जनावरांचा खर्च शिवाय वाहतुकीचा खर्चही द्यावा लागतो. त्यामुळे दुधाळ जनावरांना परराज्यातून आणण्याकरिता शेतकऱ्यांना अनुदान मिळावे अशी मागणी त्यांनी लिकसभेत केली.

पुढे बोलताना ते म्हणाले , अशापद्धतीने इतर राज्यातून महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये दुधाळ जनावरे आणून सार्वजनिक किंवा सहकारी गोठे तयार करून त्याच्या दुधामार्फ़त खाजगी दूध कंपन्या जितका पैसा कमावतात तेवढा पैसा कास्तकराना मिळत नाही. मात्र वाहतुकीसाठी अनुदान दिल्यास तो कास्तकारांचा खर्च कमी होईल. एका ट्रक मधून अधिक जनावरे नेता येतील आणि पाच सहा शेतकऱ्यांना फायदा होईल. याशिवाय मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे या भागात दुधाचा पुरवठा गुजरातमधून केला जातो . तो थांबून राज्यातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल त्यामुळे या मागणीवर विचार करावा. अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली.

Leave a Comment

error: Content is protected !!