‘ई-पीक पाहणी’तूनच आता खरेदीचीही होणार नोंदणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारकडून ई -पीक पहाणी हा उपक्रम सुरु केला आहे. यावर आतापर्यन्त पीक पेऱ्याची नोंद केली जात होती. शेतजमिनीचे छायाचित्र अशी देखील माहिती यावर अपलोड करता येत होती. मात्र आता इ पीक पहाणीच्या माध्यमातून पिकांच्या खरेदी विक्री याबाबतची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे आता पिकांच्या नोंदणी बरोबरच खरेदीची नोंद सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.

खरीप हंगाम मध्ये मागील वर्षी इ पीक पाहणी ला चांगला प्रतिसाद मिळाला होता मात्र रब्बी पिकाच्या हंगामाच्या वेळी पीक पाहणी उपक्रमाला म्हणावा तसा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळालेला दिसत नाहीये. यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढला पाहिजे याशिवाय खरेदी केंद्रावर शेतमालाची विक्री करायची असल्यास त्याची सोयही ही ई पीक पहाणी माध्यमातून मोबाईल अँप माध्यमाद्वारे करता येणे शक्‍य व्हावं यासाठी पिकांची खरेदी आणि त्याची नोंदणी याची सोय आता ई पीक पाहणी या ॲप वर करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणी करणं सोपं जाणार आहे

सद्यस्थितीमध्ये ई पिक पाहणीच्या माध्यमातून केवळ पिकांची नोंदणी केली जात आहेत याची माहिती घेतली जात आहे जर यानंतर पिकाचे नुकसान झाला तर मात्र पुन्हा पंचनामा करावाच लागतो आणि आर्थिक मदतीसाठी पूर्वसूचना ह्या संबंधित विभागाकडे द्यावे लागतात पूर्वसूचना किंवा पंचनाम्याची सुविधाही यात नाही पण आता नुकसान होतास पिकांचा फोटो अपलोड करण्याची सुविधा मात्र या ॲपमध्ये दिली जाणार आहे.

समजा आता शेतकऱ्यांना हरभरा या पिकाची ई पीक पाहणी करून झाली की लगेच शेजारी असलेल्या नोंदणी बटनाला क्लिक करून खरेदी ची नोंदणी देखील करता येणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे पुन्हा खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करण्यासाठीचा वेळ आणि पैसा देखील वाया जाणार नाही. ती आवश्यकता शेतकऱ्यांना भासणार नाही सध्या या प्रणालीबाबत चाचण्या घेतल्या जात आहेत. लवकरच ही सुविधा शेकऱ्यांना उपलब्ध होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!