हॅलो कृषी ऑनलाईन: रब्बी ज्वारीची (Rabi Jowar) लागवड महाराष्ट्रात (Maharashtra) पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. पश्चिम महाराष्ट्रात फक्त रब्बी ज्वारीची लागवड केली जाते खरीप ज्वारीची केली जात नाही, या उलट मराठवाड्यात दोन्ही म्हणजे खरीप आणि रब्बी हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. आजच्या लेखात जाणून घेऊ या रब्बी ज्वारी (Rabi Jowar) लागवडीचा योग्य कालावधी (Sowing Period) आणि सुधारित वाण (Improved Varieties).
रब्बी ज्वारी लागवडीचा योग्य कालावधी
- महाराष्ट्रात रब्बी ज्वारीची (Rabi Jowar) पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान केली जाते. पावसाच्या ओलीवर 5 सें.मी. खोल रब्बी ज्वारीची लागवड करतात.
- रब्बी ज्वारीसाठी ऑक्टोबर महिन्याचा पहिला पंधरवाडा (1 ते 15 ऑक्टोबर) हा कालावधी सर्वांत चांगला असून, या काळात पेरणी केल्यास रब्बी ज्वारीचे उत्पादन चांगले मिळते.
- लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा (Sorghum Stem Fly) उपद्रव वाढतो.
- उशिरा पेरणी केल्यास जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे बियाणांची उगवण कमी होऊन ताटांची योग्य संख्या राखता येत नाही.
रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी शिफारस केलेले वाण (Rabi Jowar Recommended Variety)
रब्बी ज्वारीच्या (Rabi Jowar) पेरणीसाठी मातीच्या प्रकारानुसार, व उपयोगानुसार सुधारित/संकरित जातीचे खालीलप्रमाणे वाण शिफारस केलेले आहे.
- हलक्या जमिनीसाठी – फुले अनुराधा, फुले माऊली, फुले यशोमती
- मध्यम जमिनीसाठी – फुले सुचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती, मालदांडी 35-1
- भारी जमिनीसाठी – फुले वसुधा, फुले यशोदा, CSV- 12, PKV- क्रांती, परभणी मोती, हायब्रीड वाण:- CSH-15, CSH-19
- बागायती क्षेत्रासाठी – फुले रेवती, फुले वसुधा, CSV-18, CSH-15 आणि CSH-19
- हुरड्यासाठी – फुले उत्तरा, फुले मधुर
- लाह्यांसाठी – फुले पंचमी
- पापडासाठी – फुले रोहिणी