Rabi MSP 2025 : केंद्राकडून रब्बी पिकांचे हमीभाव दर जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (Rabi MSP 2025) वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गहू, बार्ली, हरभरा, मसूर, मोहरी, करडई या रब्बी हंगामातील पिकांच्या हमीभावामध्ये वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

रब्बी पिकांसाठी जाहीर केलेली एमएसपी (Rabi MSP 2025)

पिकाचे नाव 2025-26 चा हमीभाव* 2024-25 चा हमीभाव* केलेली वाढ
 गहू रु. 2425 रु. 2275 रु. 150
 बार्ली रु. 1980 रु. 1850 रु. 130
 हरभरा रु. 5650 रु. 5440 रु. 210
 मसूर रु. 6700 रु. 6425 रु. 275
 मोहरी रु. 5950 रु. 5650 रु. 300
 करडई रु. 5940 रु. 5800 रु. 140
* प्रति क्विंटल
error: Content is protected !!