Tomato Nursery Management: रब्बी टोमॅटो लागवडीसाठी ‘या’ पद्धतीने करा रोपवाटिका व्यवस्थापन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप महिन्यात टोमॅटोची (Tomato Nursery Management) कमी झालेली लागवड आणि पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान व पर्यायाने उत्पादनात (Tomato Production) घट यामुळे बरेच शेतकरी आता रब्बी टोमॅटो लागवडीकडे (Rabi Tomato Cultivation) वळण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत रोपवाटिकेत रोपे तयार केली जातात आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात रोपांची पुनर्लागवड केली जाते. रोपवाटिकेत टोमॅटो पिकाचे व्यवस्थापन (Tomato Nursery Management) कसे करायचे याविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊ या.

रोपवाटिकेत टोमॅटो लागवड व्यवस्थापन   (Tomato Nursery Management)

  • साधारणपणे सरळ वाणासाठी 160 ग्रॅम बियाणे तर संकरित वाणांसाठी 50 ग्रॅम बियाणे प्रति एकर पुरेसे आहे.
  • लागवडीपूर्वी बियाण्यांना बीजप्रक्रिया (Tomato Seed Treatment) करण्यासाठी थायरम किंवा कॅप्टन 3 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात चोळावे. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे.
  • साधारणपणे 1 एकर क्षेत्रावर लागवड करण्यासाठी 1.2 गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका (Tomato Nursery) पुरेशी असते. रोपवाटिकेची जमीन आडवी व उभी नागरून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात.
  • त्यानंतर 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 15 सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत.
  • गादीवाफ्यामध्ये 5 किलो चांगले कुजलेले शेणखत, 80 ग्रॅम 19:19:19 किंवा 100 ग्रॅम 15:15:15 आणि 200 ग्रॅम निंबोळी पेंड चांगले मिसळावे. सोबत ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम एकसारखे मिसळून घ्यावे. जेणेकरून रोप वाटिकेमध्ये (Tomato Nursery Management) मर रोगाचा (Tomato Wilt) प्रादुर्भाव टाळला जाईल.
  • गादीवाफ्यावर हाताने किंवा खुरप्याच्या सहाय्याने 10 सें.मी. अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये 1 सें.मी. अंतरावर बी पेरावे. लगेच बी मातीने झाकून झारीने हलके पाणी द्यावे.
  • साधारण 5 ते 8 दिवसांत बी उगवते. बी उगवे पर्यंत झारीने पाणी द्यावे.
  • नंतर जमिनीच्या मगदूरानुसार पाटाने पाणी द्यावे. पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रोपे उगवल्यानंतर 60- 100 मेश नायलॉन नेट (Nylon Net For Nursery) किंवा पांढरे पातळ कापड २ मीटर उंची पर्यंत मच्छरदाणी प्रमाणे गादीवाफ्यावर लावून रोपे झाकून घ्यावीत.
  • रोपे 25 ते 30 दिवसांत पुनर्लागवडीसाठी (Tomato Transplanting) तयार होतात.
error: Content is protected !!