हॅलो कृषी ऑनलाईन: रब्बी हंगाम पिकांची लागवड सुरु झालेली आहे. यावर्षी गहू लागवड (Rabi Wheat Sowing) करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या पिकाची पूर्वमशागत, सुधारित जाती, बीजप्रक्रिया आणि पेरणी पद्धती याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी महत्वपूर्ण सल्ला दिलेला आहे. जाणून घेऊ याविषयी.
गहू पिकाचे लागवड पूर्व नियोजन (Rabi Wheat Sowing)
- बागायती गहू पिकाचे (Irrigated Wheat Crop) नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांनी भारी व खोल जमीन निवडून पूर्व मशागत करावी.
- जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी 2.5 ते 4 मीटर रुंद व 7 ते 25 मीटर लांब आकाराचे सरे पाडावेत.
- जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर कोरडवाहू क्षेत्रातील गव्हाची (Rainfed Wheat) पेरणी 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावी. संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पेरणी 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान करावी.
- संरक्षित पाण्याखालील गव्हासाठी हेक्टरी 75 ते 100 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे (Rabi Wheat Sowing).
कोरडवाहू आणि मर्यादित सिंचनासाठी सुधारित जाती (Wheat Improved Variety)
सरबती जाती (जिरायती/कोरडवाहू)– एन.आय.ए.डब्लू. 1415 (नेत्रावती)
सरबती जाती (मर्यादित सिंचन) – एन.आय.ए.डब्लू. 1994 (फुले समाधान), एन.आय.ए.डब्लू. 3624 (फुले अनुपम), एन.आय.ए.डब्लू. 3170 (फुले सात्विक), एन.आय.ए.डब्लू. 1415 (नेत्रावती)
बन्सी जात (कोरडवाहू)- एम.ए.सी.एस.4028, एन.आय.डी.डब्लू.1949, एम.ए.सी.एस.4058
तांबेरा प्रतिकारक वाण- ए.के .डी. डब्लू 2997- 16 (शरद)
बीज प्रक्रिया आणि पेरणी (Rabi Wheat Sowing)
- पेरणीपूवी बियाण्यास थायरम (75% डब्लू. एस.) 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया (Wheat Seed Treatment) करावी. बियाणे वाळवल्यानंतर प्रति किलो बियाण्यास 25 ग्रॅम अॅझोटोबॅक्टर आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. बीज प्रक्रियेमुळे उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होते.
- पेरणीच्या (Wheat Sowing Method) वेळी जमिनीत पुरेशी ओल असावी. पेरणी 5 ते 6 सेंमी खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. संरक्षित पाण्याखालील गव्हाची पेरणी दोन ओळीत 20 सेंमी अंतर ठेवून करावी. पेरणी उभी आडवी अशी दोन्ही बाजूने न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करता येते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दाबून झाकले जाते.