Radish cultivation : गाजराची लागवड करून शेतकऱ्याचे बदलले नशीब; केली लाखो रुपयांची कमाई; जाणून घ्या कसं केलं नियोजन?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Radish cultivation : शेतकरी सध्या शेती करताना विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करताना दिसत आहेत. अनेक शेतकरी भाजीपाल्यांची लागवड करून लाखो ते करोडो रुपये कमावत आहेत. यामध्येच आता सध्या बिहारमधील एका शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. चर्चा होण्याचं कारण असं की, या शेतकऱ्याने विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड सोडून फक्त गाजराचीच शेती करण्यास सुरुवात केली. आणि आज तो शाइतकारी लाखो रुपये कमावत आहे.

बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील शेतकरी रमाशंकर यांचे कुटुंब पिढ्यानपिढ्या भाजीपाल्याची शेती करत आहे. रमाशंकर कुटुंबातील सर्वात सुशिक्षित असल्याने त्यांना शेतीबद्दल अधिक कल्पना होत्या. ते राज्याच्या कृषी विभागाकडून शेतीबाबत विविध प्रकारची माहिती घेत असत. यावेळी त्यांची भेट एका कृषी अधिकाऱ्याशी झाली. यावेळी एका अधिकाऱ्याने रमाशंकर यांना गाजराची लागवड करण्याचा सल्ला दिला. त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर रमाशंकर यांनी कुटुंबाच्या मदतीने 3 एकर शेतात फक्त गाजराची लागवड करण्यास सुरुवात केली.

फक्त सेंद्रिय खतांचा केला वापर

रमाशंकर सांगतात की, ते गाजर पिकात फक्त सेंद्रिय खतांचा वापर करतात. शेण आणि कडुलिंबापासून तयार केलेले खत शिंपडतात. याशिवाय गाजर जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी त्यांनी घरात कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली आहे. या कामात त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांना साथ देत आहे. त्यामुळे यांना यामधून चांगला नफा मिळत आहेत.

गाजराला किती बाजार भाव मिळतो?

शेतकरी मित्रांनो तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे सर्वांना घरी बसून सर्व गोष्टींची माहिती पाहिजे असते याच गोष्टीचा विचार करून आम्ही देखील शेतकऱ्यांचे काम सोपी केले आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक खास अँप बनवले आहे. ज्याचं नाव आहे Hello Krushi या ॲपच्या माध्यमातून शेतकरी शेतमालाचे बाजार भाव अगदी काही मिनिटातच पाहू शकतात. फक्त शेतमालाचे भाव नाही तर सरकारी योजना, हवामान अंदाज, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा ,इत्यादी गोष्टींची माहिती शेतकरी अगदी मोफत या ॲपच्या माध्यमातून मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असेल तर लगेच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले हॅलो कृषी हे ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करा.

कमाई

कामाबद्दल शेतकरी रमाशंकर सांगतात की ते दरवर्षी 7 ते 8 लाख रुपये कमावतात. केमिकल फ्री असल्याने त्यांच्या गाजरांना बाजारात मागणी जास्त आहे. लग्नसमारंभात गाजराची मागणी वाढते. अशा परिस्थितीत त्यांची कमाई या काळात 2 ते 3 लाख रुपयांनी वाढते. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

error: Content is protected !!