Radish Planting : या जातीच्या मुळ्याची लागवड करा, मिळेल भरघोस नफा, जाणून घ्या अधिक..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Radish planting : सध्या शेतकरी वेगेवेगळ्या पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न घेत आहेत. कमी खर्चामध्ये शेतकरी जास्त नफा मिळवत आहेत. यासाठी शेतकरी नवनवीन पिकांची लागवड करण्यास प्राधान्य देतात. आपल्याकडे अनेकजण मुळा शेती देखील करतात आणि यामधून चांगला नफा कमावतात. बऱ्याचदा मुळा शेतीती परवड नसल्याचे देखील अनेक शेतकरी म्हणतात. मात्र यामध्ये न परवडण्याचं कारण म्हणजे तुम्ही मुळा लागवड करताना योग्य वाणाची लागवड करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला यामध्ये परवडत नाही.

योग्य वाणाची निवड महत्वाची

मात्र तुम्ही जर यामध्ये योग्य वाणाची लागवड केली तर तुम्हाला यामधून चांगला फायदा मिळतो. कोणत्याही पिकाची लागवड करायची म्हंटल की योग्य वाणाची निवड करणे गरजेचे आहे. तसेच मुळा लागवड करताना देखील योग्य वाणाची लागवड करणे गरजेचे आहे. भारतीय कृषी संशोधनाने मुळ्याच्या अनेक जाती विकसित केल्या आहेत. त्यामध्ये पुसा चेतकी आणि पुसा मृदुला या जातींची लागवड करून तुम्ही चांगले उत्पादन घेऊ शकता. (Radish planting)

पुसा चेतकी व पुसा मृदुला या जातींची लागवड कमी वेळात लवकर होते. या जातीच्या मुळ्याची पाने एकसारखी हिरवी व न कापलेली असतात व त्याची पाने भाजीमध्ये वापरतात. या जातीचे उत्पादन ३५ ते ४० पर्यंत मिळते. पुसा चेटकीची मुळं २५ ते ३० सेंमी लांब, खायला खूप चवदार असतात. परिमाणी याला बाजारात देखील मोठी मागणी असते आणि बाजारात मागणी असल्यामुळे याला भाव देखील चांगला मिळतो.

पुसा मृदुला

मुळ्याची पुसा मृदुला ही जात गोलाकार व लाल रंगाची असते. तसेच ही जात फार कमी वेळात तयार होते. त्याच्या तयार होण्याचा कालावधी २८ ते ३२ दिवसांचा असतो. मुळ्याचे मूळ हे कमी असते. मात्र यातून उत्पादन जास्त निघते. याच्या लागवडीसाठी चुनखडी किंवा चिकणमाती माती त्याच्या पेरणीसाठी चांगली मानली जाते. ती मेडवर देखील पेरली जाऊ शकते. याची लागवड करताना ज्या शेतात पाणी साचणार नाही त्या ठिकाणी लागवड करावी.

error: Content is protected !!