हेलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुढील तीन ते चार दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात (Rain in Maharashtra) काही ठिकाणी तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज (दि. 18) राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
पंजाब डख यांचा हवामान अंदाज (Rain in Maharashtra)
राज्यात दि. 18 ते 21 ऑक्टोबरदरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे. कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे. दि. 22 ऑक्टोबरपासून राज्यातून पाऊस निघून जाणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन करावे.
दि. 23 ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रात धुके पडणार आहे. तर दि. 24 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात धुके पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातून 23 तारखेला तर उर्वरित भागातून 24 तारखेला पाऊस निघून जाणार आहे. 5 नोव्हेंबरला राज्यात चांगल्या प्रकारे थंडी पडेल. हवामानात काही बदल झाल्यास अपडेट दिले जाईल, असे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी सांगितले आहे.