Rain Update : सध्या राज्यात पावसाने चांगलीच दडी मारल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे खरीप पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान सध्याची कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसासाठी पूरक जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. लवकरात लवकर पाऊस आला नाही तर पिके नष्ट होतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या पंधरवड्यात म्हणजेच ७ सप्टेंबर पर्यंत मुंबईसह कोकण आणि काहीसा घाट माथा वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होईल त्याचबरोबर ढगाळ वातावरणाची शक्यता अधिक जाणवेल असे ते म्हणाले आहेत. मात्र कोकणात जोरदार तर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता आहे.
तुमच्या गावात कधी पाऊस पडणार?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर एका मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवर रोजच्या रोज हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर लगेचच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही रोजचा हवामान अंदाज पाहू शकता. त्याचबरोबर तुमच्या गावात कधी पाऊस पडणार? याबाबतची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर शेतमालाचे बाजार भाव, सरकारी योजना, शेतकऱ्यांनी बनवलेली नवनवीन जुगाडे, पशूंची खरेदी विक्री, सातबारा उतारा, डिजिटल सातबारा या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला अगदी मोफत मिळेल त्यामुळे लगेच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.
७ सप्टेंबर नंतर पावसाची स्थिती कशी असेल?
सात सप्टेंबर नंतर पावसाची स्थिती त्यावेळीच्या वातावरणातील बदलावर अवलंबून असेल असे माणिकराव खुळे म्हणाले आहेत. त्याचबरोबर ज्याने तीन महिने साथ दिली नाही त्याच्याकडून दडी महिन्यात पावसाची काय अपेक्षा ठेवावी असे देखील माणिकराव खुळे म्हणाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पिकांची काळजी वाटू लागली आहे सप्टेंबर महिन्यात पाऊस नाही झाला तर पिके नष्ट होतील. खरीप हंगाम वाया जाईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
खरिपाची पिके धोक्यात
फक्त पावसावर अवलंबून असणाऱ्या खरीप हंगामातील सध्याची पिके माना टाकत आहे. तर काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. सध्या या पिकांना पाण्याची खूप गरज असून पिक वाचवण्यासाठी शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी तर शेतकरी पिकांवर रोटाव्हेटर मारण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर राज्यात पावसाचे चांगले आगमन व्हावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.