Rainfall Update: पंधरा वर्षांनंतर ‘या’ जिल्ह्यात झाली 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यावेळी मॉन्सून (Rainfall Update) अगदी वेळेवर पोहचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यात अगदी आनंदाचे वातावरण आहे. बहुतेक ठिकाणी आता पेरणीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) असा जिल्हा आहे जिथे तब्बल 17 वर्षांनंतर म्हणजे 2007 नंतर जिल्ह्यात यंदा जून महिन्यात दोनशे मिमीपेक्षा अधिक पावसाची (Monsoon Update) नोंद झाली आहे, आणी हा जिल्हा आहे सोलापूर (Solapur District).  

2007 मध्ये जून महिन्यात जिल्ह्यात एकूण 236.5 मिमी पावसाची नोंद झाली होती (Rainfall Update). यंदा  228.2 मिमी पाऊस पडला आहे (Higher Rainfall In June). मागील 25 वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, अवघे दोन वर्षे दमदार पाऊस पडला आहे.

सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी (Average Rainfall) 102 मिमी पाऊस पडणे अपेक्षित आहे, म्हणजे जूनमध्ये 102 मिमी पाऊस पडला, तर पुरेसा पाऊस झाला असे म्हणता येईल. जानेवारीनंतर कडक उन्हाळा सुरू होतो व मे महिन्यात, तर उन्हाची लाही-लाही होते.

त्यामुळे केवळ सरासरी इतका 102 मिमी पाऊस पडला, तर जमीन थंड होत नाही व वातावरणात फार असा बदल होत नाही. मात्र, तीन-चार दिवस दमदार पाऊस पडला (Rainfall Update) व काही दिवस हलक्या सरी कोसळत राहिल्या, तर हवेत गारवा तयार होतो.

यंदा जून महिन्यात पहिल्या पंधरवड्यात दमदार पावसाच्या धारांची 222 टक्क्यांपेक्षा अधिक नोंद झाली आहे (Rainfall Update). 2000 पासून म्हणजे मागील 25 वर्षात जून महिन्यात पडलेल्या पावसाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, 2007 व या वर्षी सरासरीच्या दुपटीहून अधिक पाऊस पडला आहे. या 25 वर्षांत तब्बल 15 वर्षे जून महिन्यात सरासरी 102 मिमी पाऊस असताना, कमीतकमी 14 मिमी व अधिकाधिक 90 मिमी इतकाच पाऊस पडला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यावर्षी शेतकर्‍यांना खरीपाची जास्त प्रमाणात पेरणी करता येईल.

error: Content is protected !!