हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरातील लोकसभा निवडणुकांचे सर्व निकाल (Raju Shetti) हाती आले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना कारवा लागलेल्या शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना साद घालत भावनीक पोस्ट केली आहे. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यात तिरंगी लढत झाली. ज्यात शेट्टी यांना क्रमांक तीनची मते मिळाली आहे. त्यामुळे पराभवानंतर आता शेट्टींनी भावनिक पोस्ट करत शेतकऱ्यांना साद घातली आहे.
नेमके काय म्हणाले राजू शेट्टी? (Raju Shetti On Lok Sabha election Defeat)
पराभवानंतर राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी माझे काय चुकले! प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांनो तुम्हीही… असे म्हणत पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांनी विजयाचा दावा केला होता. सर्वसामान्य शेतकरी गरीब कष्टकरी वर्ग माझ्या पाठीशी असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले होते. मात्र, या मतदारसंघातील जनतेने पुन्हा धैर्यशील माने यांना विजयाचा कौल दिला आहे. माने हे 13426 मतांनी विजयी झाले आहेत.
शेट्टींना किती मते मिळाली?
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. अत्यंत अटीतटीची ही लढत झाली. यामध्ये धैर्यशील माने हे फक्त 13426 मतांनी विजयी झाले आहेत. माने यांना एकूण 520190 मते मिळाली तर सत्यजीत पाटील यांना एकूण 506764 मते मिळाली. तर राजू शेट्टींना एकूण 179850 मते मिळाली. या निवडणुकीत राजू शेट्टींचा तब्बल 340000 मतांनी पराभव झाला आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत चुरशीची मानली जात होती. या मतदारसंघात तिरंगी लढत होती. यामध्ये धैर्यशील माने आणि सत्यजीत पाटील यांच्यात काँटे की टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणारे राजू शेट्टी यांना क्रमांक तीनची मते मिळाली. त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. यानंतर राजू शेट्टी यांनी ही भावनिक पोस्ट केली आहे.