केंद्राने दुधाला हमीभाव जाहीर करण्याबाबत धोरण ठरवावे, राजू शेट्टींची मंत्री बलियान यांच्याकडे मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उसाप्रमाणे दुधाला देखील हमीभाव मिळावा या मागणीकरिता अनेक शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. मात्र द्यपही त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. याच मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री संजीव बलियान यांची दिल्ली येथे भेट घेतली.

जागतिक स्पर्धेत दुग्ध व्यवसाय टिकवायचा असेल तर केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर दुधाला हमीभाव जाहीर करण्याबाबत धोरण ठरवावं अशी मागणी राजू शेट्टींनी केंद्रीय मंत्री संजीव बलियान यांच्याकडे केली आहे. दुधाचा वाढलेला उत्पादन खर्च विचारात घेता सध्या दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

याविषयी पुढे बोलताना ते म्हणाले, दुधाच्या दरासंदर्भातील विषयावर केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली. जागतिक स्पर्धेत दुग्ध व्यवसाय टिकवायचा असेल तर केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर दुधाला हमीभाव जाहीर करण्याबाबत धोरण ठरवावं, अशी मागणी शेट्टींनी केली आहे. यावेळी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक उत्तर प्रदेशचे माजी आमदार व्ही. एम. सिंग देखील उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!