एकरात तब्बल 90 क्विंटल कांद्याचे विक्रमी उत्पादन, मिळाला एक लाखांचा निव्वळ नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथील एका शेतकऱ्याने पहिल्यांदाच यावर्षी नाशिकच्या लाल कांद्याच्या लागवडीचा प्रयोग केला होता. पहिल्याच वर्षी या शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. एकारात तीस चाळीस क्विंटल नव्हे तर चक्क 90 क्विंटल लाल कांदाचे उत्पादन या शेतकऱ्याने घेतले आहे.

जिल्ह्यात लाल कांद्याचे उत्पादन घेणारे पहिले शेतकरी

अमरावती जिल्ह्यातील कापूस तळनी येथील राजेश मळसने हे मागील अनेक वर्षांपासून पांढऱ्या कांद्याची लागवड करत होते. परंतु अनेकदा अवकाळी पावसामुळे या कांद्याला फटका बसत होता. परंतु त्यांनी यावर्षी नाशिकचा लाल कांदा शेतात लावण्याचा निश्चय त्यांनी केला . या वर्षी त्यांनी एक एकर शेतीवर खरीप हंगामात लाल कांद्याची लागवड केली होती. शेतात गोमूत्र, भरपूर शेणखत, गुणवत्तापूर्ण बियाणे, वेळेवर अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, कीटकनाशकांचा योग्य वेळी वापर अशा त्रिसूत्रीच्या तसेच वेळोवेळी फवारणी करून त्यांनी या वर्षी एक एकरात तब्बल 90 क्विंटल लाल कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. अमरावती जिल्ह्यात लाल कांद्याचे उत्पादन घेणारे पहिले शेतकरी असल्याचा राजेश मळसने सांगतात..

मिळाला एक लाखांचा निव्वळ नफा

मळसने यांनी यावेळी कांदा पिकासाठी जवळपास 53 हजार रुपये खर्च केले. त्यातून त्यांचे उत्पादन 1 लाख 53 हजार रुपयांचे त्यांना उत्पादन झाले 17 रुपये किलोप्रमाणे त्यांनी त्यांचा कांदा शेतातून विकला. खर्च वजा जाता त्यांना एका एकरात निव्वळ एक लाख रुपयांचा नफा मिळाला. येथील कृषी सहाय्यक मारुती जाधव यांनी वेळोवेळी राजेश मळसने यांच्या शेताचा पाहणी दौरा केली. त्यांना विविध औषधांसाठी प्रोत्साहित व मदत केली. कृषिसाहाय्यक मारोती जाधव यांनी त्यांच्या सल्ल्यानुसार व शास्त्रीय पद्धतीने नियोजन केल्याने खरीप हंगामात उल्लेखनीय उत्पादन घेता आले .

Leave a Comment

error: Content is protected !!