Weather Update : राज्यात धुव्वाधार ! आज पुणे नाशिकसह 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात सध्या पावसाचा जोर वाढलेला (Weather Update) आहे. अनेक नद्यांना पूर आलाय तर अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये शेती पाण्याखाली गेली आहे.

दरम्यान आजही राज्यात पावसाचा जोर (Weather Update) कायम राहणार असून पुढे नाशिक आणि पालघर,सातारा या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर अमरावती, यवतमाळ, वर्धा ,नागपूर या भागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अहमदनगर, बीड, जालना, औरंगाबाद, बुलढाणा ,वाशिम, अकोला, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्हाना देखील हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्या भागाला रेड अलर्ट दिला आहे या भागात आज मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल करीत असून पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्वच नद्या पात्राबाहेर गेल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखालीगेली असून NDRF पथकं कोल्हापूर आणि शिरोळमध्ये दाखल झाली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत आहे.

रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील 23 धरणं 100 टक्के भरली आहेत. खेडमधील 4 मोठ्या धरणांमधून विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शाळांना सुट्टी

अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर प्रशासन सज्ज झाले असून पुणे, ठाणे, नांदेड, रायगडात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईतही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून कामाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचना (Weather Update) देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!