हॅलो कृषी ऑनलाईन: लाल आणि काळे तांदूळ (Red And Black Rice) ज्याला आपण चकाऊ (Chakhao Rice) असे सुद्धा म्हणतो याचे भात बियाणे विक्रीस (Rice Seed For Sale) सुरुवात झाली आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात भात लागवड (Paddy Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते. यात इंद्रायणी भातासह इतर वाण पेरले जातात. सध्या भात पेरणीची लगबग सुरू असल्याने शेतकरी भात पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. यातच काळा आणि लाल भात देखील काही प्रमाणात केला जातो. या दोन्ही वाणांची (Red And Black Rice) विक्री सुरू असून शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
नाशिक (Nashik) कृषी विभाग आत्माच्या (Atma Krushi Vibhag) माध्यमातून पेठ तालुक्यातील ‘वनराज शेतकरी उत्पादक (Vanraj Farmers Producers Company) कंपनीला लाल आणि काळे वाणाचे भात (Red And Black Rice) बियाणे देण्यात आले होते. या कंपनीने आपल्या शेतात या दोन्ही वाणांचे उत्पादन घेत यंदा शेतकर्यांसाठी या दोन्ही वाणांचे बियाणे (Rice Seed) उपलब्ध करून दिले आहेत. यात रेड राईस (इंद्रायणी 7) ब्लॅक राईस (चकाऊ) हे भात बियाणे विक्रीस सुरवात झाली असून जवळपास 60 किलोहून अधिक बियाण्यांची विक्री झाली आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांना बियाणे (Red And Black Rice) आवश्यक आहेत, त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
अशी आहे भात बियाण्यांची किंमत (Red And Black Rice Rate)
या ठिकाणी 5 किलो बियाण्याची बॅग असून ती 50 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. तर ज्या शेतकर्यांनी या बियाण्यांची लागवड केल्यास त्यांचे निघालेले उत्पादन 30 किलो प्रमाणे खरेदी केले जाणार आहे. सद्यस्थितीत बियाणे विक्री सुरू असल्याने जास्तीत जास्त शेतकर्यांनी या बियाण्यांचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. प्रथम येणार्यास प्राधान्य दिले जाईल, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
येथे संपर्क साधा
यशवंत गावंडे (अध्यक्ष, वनराज शेतकरी उत्पादक कंपनी)
मोबाईल नंबर – 94230709111